India vs England (Photo Credits: Twitter)

IND vs ENG 1st Test Probable Playing XI: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) संघात रंगतदार मालिकेला सुरुवात होणार आहे. 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार असताना सर्व चाहत्यांचे लक्ष पहिल्या टेस्टसाठी भारतीय संघाच्या (Indian Team) प्लेइंग इलेव्हनकाढे लागून आहे ज्यात काही बदल अपेक्षित आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) की रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha), कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का? टीम मॅनेजमेंट वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवेल की अक्षर पटेलला (Axar Patel) पदार्पणाची संधी मिळेल असे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांना पडले आहे. अशा स्थितीत चार सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी भारतीय टीम मॅनेजमेंट प्लेइंग इलेव्हनमध्ये करू शकणाऱ्या 3 बदलांबद्दल जाणून घेणार आहोत. टीम इंडिया पहिल्या टेस्टसाठी आघाडीच्या फळीत बदल करताना दिसत नाही. (IND vs ENG Test 2021: विराट कोहलीपुढे शतकाचा दुष्काळ संपवण्याचं मोठं चॅलेंज, इंग्लंडविरुद्ध शतकी धमका करण्यासाठी उत्सुक)

रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला येतील तर चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरतील. मात्र, अनुभवी साहा की युवा मॅच-फिनिशर पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याबाबत समस्या उदभवू शकते. ऑस्ट्रेलियाची सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटी सामन्यात पंतची मॅच-विनिंग कामगिरी भारतीय संघ व्यवस्थापनाला साहाला बेंचवर बसण्यास भाग पडू शकते, त्यामुळे पंत सहाव्या स्थानावर फलंदाजी करताना दिसू शकतो. गोलंदाजीत भारतीय संघ फिरकीपटूंना प्राधान्य देईल यात शंका नाही. चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदतगार असल्याने अश्विननंतर कुलदीप यादव संघाचा दुसरा पर्याय असेल. शिवाय, रवींद्र जडेजाची दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने कुलदीपकडे स्वतःहून संधी चालून येईल. दुसरीकडे, श्रीलंकाविरुद्ध इंग्लंड फलंदाज डावखुरा फिरकीपटू गोलंदाज लसिथ एम्बुल्डेनिया याच्याविरुद्ध संघर्ष करताना दिसले, त्यामुळे भारतीय संघही त्याच रणनीतीनुसार वॉशिंग्टन सुंदरऐवजी अक्षर पटेलला प्राधान्य देतील. इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह संघाच्या वेगवान गोलंदाजी विभाग संभाळतील.

पहा टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.