रोरी बर्न्स (Photo Credit: Getty)

इंग्लंड (England)-वेस्ट इंडिज (West Indies) कसोटी मालिकेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे धुतला गेल्याने दुसऱ्या दिवसावर सर्वांचे लक्ष लागून आहे. आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताच इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स (Rory Burns) याने इंग्लंडचा सलामी फलंदाज म्हणून तब्बल 13 वर्षानंतर विशिष्ट विक्रमाची नोंद केली. बर्न्सने 16 धावा करताच त्याच्या कसोटी कारकीर्दीत 1000 धावांचा टप्पा गाठला. सर एलिस्टर कुकनंतर (Sir Alastair Cook) कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा ओलांडणारा बर्न्स इंग्लंडचा पहिला सलामी फलंदाज ठरला. वेस्ट इंडिज कर्णधार जेसन होल्डरच्या (Jason Holder) 19 व्या ओव्हरमध्ये एक धाव घेत बर्न्सने हजार धावांचा टप्पा गाठला. इंग्लंडचा माजी कर्णधार कुक हा यातील सर्वात प्रदीर्घ प्रारूपातील सर्वश्रेष्ठ सलामी फलंदाज आहे. त्याने 161 डावात 12,472 धावा केल्या आहेत. कूकने 2007 मध्ये ही कामगिरी बजावली होती. कूकच्या निवृत्तीच्या 13 वर्षानंतर एका इंग्लिश फलंदाजाने अशी कामगिरी बजावली आहे. (ENG vs WI 1st Test: टॉस दरम्यान जेसन होल्डरला पडला ICC च्या नियमांचा विसर, कॉमेंटेटर देखील लागले हसू, पाहा व्हिडिओ)

बर्न्स इंग्लंडचा एकूण 28 वा सलामी फलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये हजारी पूर्ण केली आहे. बर्न्सने नोव्हेंबर 2018 मध्ये पदार्पण केले आणि दोन शतकांसह 34.79 च्या सरासरीने 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आजवर 28 इंग्लिश फलंदाजांनी 1000 हुन अधिक कसोटी धावा केल्या आहेत आणि आज बर्न्सच्या नावाचाही यामध्ये समावेश झाला आहे. दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात बर्न्स चार चौकारासह 30 धावा करून बाद झाला.

पहिल्या दिवशी पावसाने खेळत व्यत्यय आणला ज्यामुळे फक्त 17.4 ओव्हरचा खेळ झाला. सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. शॅनन गॅब्रिएलने डोमिनिक सिबलीला शून्यावर बाद करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यांनतर दुसऱ्या दिवशीहीगॅब्रिएलने आपली शानदार गोलंदाजी कायम ठेवली. त्याने दुसऱ्या दिवशी सुरुवातीला जो डेन्ली, बर्न्स यांना बाद करून वेस्ट इंडिजला सामन्यात आघाडी मिळवून दिली.