Photo Credit: PTI

आयसीसी (ICC) विश्वकपच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडिया (Team India) ची लढत आज यजमान इंग्लंड (England) शी होणार आहे. भारत (India) -इंग्लंड मधील सामना बर्मिंगहॅम (Birmingham) च्या एजबस्टन (Edgbaston) येथे खेळाला जाईल. हा सामना इंग्लंडसाठी महत्वाचा आहे कारण या सामन्यात पराभव झाल्यास त्यांचा सेमीफायनलमध्ये पोहचणे मुश्किल होऊ शकते. या मॅचमध्ये सर्वांचे लक्ष असणार भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) वर. वेस्ट इंडिज विरुद्ध (West Indies) चांगली कामगिरीनंतर चाहते इंग्लंडविरुद्ध धोनीकडून अश्याच खेळीची अपेक्षा करत आहेत. (विराट कोहली, एमएस धोनी यांच्यासह भारतीय संघातील खेळांडूचा भगव्या जर्सी मधील फोटो शूटचा व्हिडिओ व्हायरल Video)

मात्र, एजबस्टनच्या मैदानात सराव करताना चाहते धोनीच्या नावाचा जयघोष करत होते. तेव्हा धोनी ने चाहत्यांना 'चहा आणलात का?' असे खुणावून विचारले. एबीपी माझा ने याचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यांना तो चांगलाच पसंत पडतोय.

विश्वकपमध्ये भारताविरुद्धचा सामना इंग्लंडसाठी 'करो की मरो' असा आहे. इंग्लंड संघाने आपले शेवटचे दोन सामने गमवले आहेत. त्यामुळे सेमीफायनलच्या दृष्टीने इंग्लंडसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. यंदाच्या विश्वकपमध्ये इंग्लंडने दमदार सुरुवात केली होती, पण श्रीलंका (Sri Lanka) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सलग दोन सामन्यात पराभवने संघ अडचणीत आला आहे. सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी इंग्लंडला आपले शिल्लक दोन पैकी किमान एका सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. मात्र, भारतविरुद्ध चा सामना इतका सोपा नाही. 2019 च्या विश्वकप मध्ये भारताने आजवर एकही सामना गमावलेला नाही.