ध्रुव जुरेल रन आउट (Photo Credits: Twitter/ICC U19 World Cup)

भारत (India)-बांग्लादेशमध्ये (Bangladesh) आयसीसी अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) 2020 ची फायनल सध्या दक्षिण आफ्रिकामध्ये खेळली जात आहे. या अंतिम सामन्यात भारतीय डावादरम्यान अशीच एक विचित्र रन-आउट पाहायला मिळाली. यामध्ये कोणता फलंदाज बाद झाला हे ठरवण्यासाठी अंपायरला तब्बल पाच मिनिटं लागली, पण निर्णय घेण्यात आला आणि खेळाडूला बादही करण्यात आले. नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया पहिले फलंदाजी करीत होती. दरम्यान, रकीबुल हसन 43 वी ओव्हर टाकण्यासाठी आला आणि भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) क्रीजवर होता. ध्रुवने रकीबुलचा चेंडू ऑफ साईडला खेळला आणि धाव घेण्यासाठी धावला. दरम्यान, दुसर्‍या टोकावरून अथर्व अंकोलेकरने (Atharva Ankolekar) क्रीज सोडली, परंतु चेंडू फिल्डरच्या हातात आल्याने पाहून तो पुन्हा क्रीजच्या आता धावला. (IND vs BAN, U19 World Cup 2020 Final: टीम इंडिया 177 धावांवर ऑलआऊट, अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये बांग्लादेश ला दिले 178 धावांचे लक्ष्य)

यानंतर जे घडले तर विश्वचषकमध्ये आठवड्यात दुसऱ्यांदा झाले. ध्रुव आणि अथर्व एकाच टोकाला उभे होते आणि बांग्लादेशचा कर्णधार अकबर अलीने दुसऱ्या बाजूने विकेटवरील बेल्स उडवल्या. भारताने विकेट गमावली यात शंका नव्हती, पण कोणता फलंदाज बाद झाला यावर संभ्रम बनून होता कारण दोन्ही फलंदाजांनी एकाच वेळी क्रीजला स्पर्श केला. थर्ड अंपायरने याचा निर्णय तब्बल पाच मिनिटं लागली आणि अखेरीस ध्रुवला 22 धावांवर बाद करण्यात आले. पाहा हा व्हिडिओ:

यंदाच्या विश्वचषकमध्ये ही अशी घटना दुसऱ्यांदा घडली आहे. भारत-बांग्लादेश फायनलपूर्वी भारत-पाकिस्तान सेमीफायनलमधेही असेच चित्र पाहायला मिळाले होते. दुसरीकडे, टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारत मोठा स्कोर करू शकले नाही आणि संपूर्ण संघ 177 धावांवर ऑलआऊट झाला. आता बांग्लादेशला पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी 178 धावांची गरज आहे. भारताकडून यशस्वी जयस्वालने पुन्हा एकदा प्रभावी अर्धशतकी कामगिरी केली. यशस्वी 88 धावा करून बाद झाला आणि विश्वचषकमध्ये त्याचे दुसरे शतक हुकले. यापूर्वी, यशस्वीने पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतकी खेळी केली होती.