दिल्ली (Delhi) येथील एका महिला क्रिकेटपटूने भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (BJP MP Gautam Gambhir) यांच्याकडे ट्विटद्वारे खळबळजक आरोप करत मदतीची मागणी केली आहे. नैनू शर्मा या महिला क्रिकेटपटूने आपल्या प्रशिक्षकावर विनयभंग (Molestation) आणि बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. आपली व्यथा ट्विटर हँडलवर ट्विट करुन मांडत या क्रिकेटपटून हे ट्विट गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना टॅग केले आहे. आपल्या ट्विटमध्ये या महिला क्रिकेटपटूने हा प्रशिक्षक आपल्याला करीअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देत असल्याचेही म्हटले आहे. महिला क्रिकेटपटूच्या ट्वटनंतर दिल्ली क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हटले आहे ट्विटमध्ये?
भाजप खासदार गौतम गंभीर यांना टॅग केलेल्या ट्विटमध्ये या महिला क्रिकेटपटूने म्हटले आहे की, ''मी दिल्ली येथील एक महिला क्रिकेटपटू आहे. माझा प्रशिक्षक सातत्याने माझा विनयभंग आणि बालात्कार करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला विरोध केला असता तो मला माझे करीअरच उद्ध्वस्त करण्याची धमकी देतो. या प्रशिक्षकाची आणि निवड समितीतील लोकांची अगदी घट्ट जवळीक आहे. असे असताना मी माझ्या करीअरमध्ये पुढे जाऊ शकत नाही. कृपा करुन मला मदत करा.'' (हेही वाचा, सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार नाही -सर्वोच्च न्यायालय)
महिला क्रिकेटपटू ट्विट
Hello sir @GautamGambhir
I am a female cricketer from delhi. My coach is molesting me and trying to rape and threating me that if i complained him he will destroy my carrer as he has good relationship with the selectors and i will never go ahead. Please help me sir.
— Nainu Sharma (@NainuSharma3) December 30, 2019
दरम्यान, या महिला क्रिकेटपटूने आपल्या ट्विटमध्ये 'त्या' त्रास देणाऱ्या प्रशिक्षकाचे नाव लिहीले नाही. त्यामुळे हा प्रशिक्षक नेमका कोण याबाबत सर्वांच्याच मनात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. हे वृत्त लिहीत असे पर्यंत तरी खासदार गौतम गंभीर यांनी या महिलेच्या ट्विटला कोणताही प्रतिसाद दिल्याचे दिसून आले नाही. मात्र, गौतम गंभीर या महिलेच्या ट्विटची दखल घेऊन तिला कशा प्रकारे मदत करणार याकडे क्रिडा वर्तुळासह तमाम जनतेचे लक्ष लागले आहे.