DC vs LSG Head to Head: आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊसाठीचा 'करो या मरो'चा सामना, आकडेवारीत कोण आहे वरचढ; घ्या जाणून

IPL 2024 स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ लखनऊ सुपरजायंट्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दावेदार मानलं जात आहे. त्यामुळे आज होणारा सामना हा लखनऊसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. तर दुसरीकडे दिल्लीचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तरी त्यांच्यासाठी आजचा सामना हा प्रतिष्ठेचा मानला जात आहे. (हेही वाचा - KKR vs MI, IPL 2024: आयपीएल सामन्यादरम्यान चाहत्याचा चक्क बॉल चोरण्याचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच पकडले, Viral Video)

दिल्ली कॅपिटल्सला या संघाला या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. स्पर्धेतून बाहेर पडलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ शेवटच्या सामन्यात आपल्या बाकावर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ शकतो. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आपला गेल्या सामन्यातील पराभव विसरुन दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात करेल.

दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील हेट टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ केवळ 4 वेळेस आमने सामने आले आहेत. लखनऊ सुपर जायंट्स संघाने 3 सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.

आजच्या सामन्यात दिल्लीला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. तर दुसरीकडे लखनऊचा संघ देखील चांगली कामगिरी करतोय. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना लखनऊसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे लखनऊचा संघ विजयासाठी जोर लावताना दिसून येऊ शकतो.