डेविड वॉर्नर याने सांगितला विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ मधील फरक; भारतीय कर्णधाराशी तुलना करत केले 'हे' मोठे विधान
विराट कोहली, स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: Getty)

भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याच्यात बरीच समानता आहे, असे ऑस्ट्रेलियाचा सलामी फलदांज डेविड वॉर्नर (David Warner) याला वाटते. वॉर्नर म्हणाला की, तो आणि कोहली दोघेही आपल्या देशासाठी खेळण्याच्या उत्कटतेने प्रेरित आहेत. या शिवाय, वॉर्नरने कबूल केले की विराट आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांनी त्यांच्या संघांचे मनोबल वाढवले आहे, पण फलंदाजीची आवड आणि उत्सुकता एकमेकांपेक्षा वेगळी आहे. भारतीय कर्णधार कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज स्मिथ हे सध्याच्या काळातील दोन अव्वल क्रिकेटपटू आहेत यात शंका नाही. हे दोघेही सतत नवीन कामगिरी करत आहेत, ज्यामुळे या दोघांमध्ये कोण अधिक चांगले आहे यावर चर्चा नेहमीच होत राहिली आहे. वॉर्नरने 'क्रिकबझ इन कॉन्व्हर्वेशन' मधे हर्षा भोगले यांना सांगितले की, "स्टीव्हच्या तुलनेत विराटची आवड आणि धावा उत्सुकता वेगळी आहे." तो म्हणाला की कोहली विरोधी संघ कमकुवत करण्यासाठी धावा करतो, तर स्मिथला त्याच्या फलंदाजीचा आनंद घेतो. (विराट कोहली याला गोलंदाजी की जसप्रीत बुमराह समोर फलंदाजी? ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटपटू एलिस पेरी ने केली स्मार्ट निवड)

तो म्हणाला, 'स्टीव्ह क्रीजवर बॉल मारण्यासाठी जातो, त्याला अशाच गोष्टी दिसतात. त्याला क्रीझवर बॉल जोरदार फटकावायला बघतो, त्याला आऊट व्हायचे नसते. तो याचा आनंद घेतो." कोहलीला याची जाणीव आहे की जर तो क्रीजवर राहिल्यास त्याची टीम अव्वल स्थान गाठेल असेवॉर्नरला वाटते. दोन्ही खेळाडू मानसिकदृष्ट्या बळकट आहेत आणि जर त्यांनी चांगली खेळी केली तर यामुळे संपूर्ण संघाचे मनोबल वाढते असेही वॉर्नर म्हणाला.

दुसरीकडे, वॉर्नर म्हणतो की त्याच्यात आणि कोहलीमध्ये बरीच समानता आहे. वॉर्नर म्हणाला की आमच्या टीमने हा सामना जिंकला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि यासाठी आम्ही पूर्ण उत्कटतेने खेळतो. वॉर्नर म्हणाला, "मी विराटसाठी बोलू शकत नाही पण मला वाटते की ही आपल्यातली एक गोष्ट समान आहे की जेव्हा आपण मैदानावर जातो तेव्हा लोकांना चुकीचे सिद्ध करण्याची गरज असते." तो म्हणाला की, “जर तुम्ही त्याच्याशी स्पर्धा करीत असाल आणि तुम्ही त्याच्याकडे गेलात तर तुम्हाला असे वाटते की 'बरं, मी यापेक्षा जास्त धावा करीन, मी त्याच्याविरुद्ध एक धाव चोरी कारेन. आपण त्या गेममधील इतरांपेक्षा चांगले होण्यासाठी प्रयत्न करतात. येथून उत्कटतेने येते."