CSK vs DC, IPL 2020: एमएस धोनीने जिंकला टॉस, घेतला गोलंदाजीचा निर्णय; जोश हेजलवुडचे डेब्यू
एमएस धोनी, रिषभ पंत (Photo Credit: Facebook)

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील आयपीएलचा सातवा सामना तोडायचं वेळात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु होईल. आजच्या सामन्यात सीएसके कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेने (CSK) आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. लुंगी एनगिडीच्या जागी सीएसकेने जोश हेजलवुडला अंतिम-11मध्ये सामील केले. आहे. सीएसकेसाठी धक्का दायक बाब म्हणजे अंबाती रायुडू आणि ड्वेन ब्रावो आजच्या सामन्यात पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असतील. दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. अमित मिश्रा (Amit Mishra) आणि आवेश खानला (Avesh Khan) संधी मिळाली आहे. आजच्या सामन्यात सीएसकेचे लक्ष आपली फलंदाजी सुधरवण्यावर असेल. सीएसकेचा आयपीएलमधील (IPL) हा तिसरा, तर दिल्ली कॅपिटल्सचा दुसरा सामना आहे. चेन्नईला दोन सामन्यांपैकी एका सामन्यात खराब फलंदाजीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले होते. (CSK vs DC IPL Dream11 Team: एमएस धोनी की रिषभ पंत? सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएल सामन्याच्या ड्रीम11 मध्ये कोणत्या विकेटकीपरची कराल निवड?)

आजच्या सामन्यासाठी सीएसकेसाठी शेन वॉटसन आणि मुरली विजय डावाची सुरूवात करतील. फाफ डु प्लेसिस तिसऱ्या तर रुतुराज गायकवाड चौथ्या स्थानावर फलंदाजी करेल. रुतुराजचे पहिले आयपीएल आहे. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद होणार रुतुराज आज आपले प्रदर्शन सुधरवू पाहिलं. सीएसकेने आजच्या हेजलवुडला सामील केले जो की आयपीएल 13मधील आपला पहिला सामना खेळले. दुसरीकडे, दिल्लीने आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये रविचंद्रन अश्विनच्या जागी अमित मिश्राला आणि आवेश खानला मोहित शर्माच्या जागी सामील केले आहे. अश्विनला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात हाताला दुखापत झाली ज्यामुळे त्याला आजच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. इशांत शर्मा देखील आजच्या सामन्याला मुकणार आहे.

पाहा सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्लेइंग इलेव्हन:

चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), शेन वॉटसन, मुरली विजय, फाफ डु प्लेसिस, रुतुराज गायकवाड़, केदार जाधव, सॅम कुरन, पियुष चावला, जोश हेजलवुड, दीपक चाहर, आणि जोश हेजलवुड.

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन), शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमायर, आवेश खान, एनरिच नोर्ट्जे, अक्षर पटेल, आणि अमित मिश्रा.