कॅरिबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) मध्ये बार्बाडोस ट्रायडर्स (Barbado Tridents) संघाने गुरुवारी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्या मालकीचा संघ ट्रिनबागो नाइट रायडर्स (Trinbago Knight Riders) संघाला 63 धावांनी पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जेपी ड्युमिनी (JP Duminy) याने 65 धावांची जोरदार खेळी केली आणि बार्बाडोसला 5 विकेट्सवर 192 धावांचा स्कोर करण्यास सहाय्य केले. यासह ड्युमिनीने सीपीएमध्ये एक इतिहास रचला. ड्युमिनीने 15 चेंडूत अर्धशतक करत सीपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. टी-20 मध्ये सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये ड्युमिनी न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल, भारताचा युसूफ पठाण आणि वेस्ट इंडिजचा सुनील नरिन यांच्यासह संयुक्त चौथ्या क्रमांकावर आहे. तर, दक्षिण आफ्रिकासाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा तो फरहान बेहार्डीन यांच्यानंतर दुसरा फलंदाज आहे. (CPL 2019: वेस्ट इंडीजचा रहकीम कॉर्नवाल क्रीजच्या आत असतानाही झाला रन आउट, इंझमाम उल हक सोबत झाली तुलना Video)
ड्युमिनीने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक ठोकले, जे सीपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याने एकूण 20 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 65 धावा फटकावल्या. न्यूझीलंडच्या जिमी निशाम (Jimmy Neesham) याच्या ओव्हरला त्याने निशाणा बनवला. निशामच्या ओव्हरमध्ये 25 धावा केल्या. ड्युमिनीने शेवटच्या 13 चेंडूत 54 धावा केल्या आणि संघाला मोठा स्कोर करून दिला.
Jean-Paul Duminy picks up the fastest ever CPL FIFTY!!! #BTvTKR #CPL19 #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport pic.twitter.com/NKWci2uru7
— CPL T20 (@CPL) September 26, 2019
मॅचबद्दल बोलल्यास, बार्बाडोसच्या 192 धावांच्या प्रत्युत्तरात नाइट रायडर्सचा संपूर्ण संघ 17.4 ओव्हरमध्ये 129 बाद झाला. नाइट रायडर्ससाठी डॅरेन ब्राव्हो याने सर्वाधिक 28 धावा केल्या. बार्बाडोसच्या हेडन वॉल्शने 4 ओव्हरमध्ये 9 धावा देऊन 5 गडी बाद केले. याशिवाय, फलंदाजीनंतर ड्युमिनीने गोलंदाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि 2 गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाला मुश्किलीत पडले. या हंगामातील ट्रिनबागो नाइट रायडर्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्याने 7 सामन्यामधील 4 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. मात्र, गुणतालिकेत ते दुसर्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, बार्बाडोस ट्राइडेंट्सचा 7 सामन्यांमधील हा तिसरा विजय होता. पॉईंट्स टेबलमध्ये ते चौथ्या क्रमांकावर आहे.