भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान चर्चेत राहिलेल्या रहकीम कॉर्नवाल (Rahkeem Cornwall) सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) मध्ये देखील आपला प्रभाव पडत आहे. पण, यंदा तो ज्याप्रकारे बाद झाला तो चर्चेचा विषय बनला आहे आणि ते पाहून तर कॉमेंटेटरदेखील थक्क झाले. कॉर्नवाल ज्या प्रकारे बाद झाला त्याला आळशीपणा म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कॅरिबियन प्रीमियर लीगमधील गयाना अमेजन वॉरियर्स (Guyana Amazon Warriors) आणि सेंट लुसिया झुक्स (St Lucia Zuks) यांच्यातील मॅचदरम्यान हा प्रकार घडला. कॉर्नवॉल विकेट्सदरम्यान वेगवान धाव घेण्यासाठी प्रख्यात नाही आणि त्यामुळे एका विचित्र पद्धतीने बाद झाला. त्याच्या निष्काळजीपणामुळे आणि त्याच्या वजनामुळे तो बाद झाला असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. (CPL मॅचदरम्यान हेल्मेटला बाउन्सर लागल्याने आंद्रे रसेल जखमी, स्ट्रेचरवरून नेण्यात आले मैदानाबाहेर, पहा व्हिडिओ)
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात भारी क्रिकेट खेळाडू अशी ओळख असेलेलाकॉर्नवाल सीपीएल मॅचदरम्यान जेव्हा क्रीजजवळ गेला तेव्हा त्याने आपली बॅट खाली टेकवली नाही आणि विकेटकीपरने त्याला धाव बाद केले. त्याचे पूर्ण शरीर क्रीजच्या आत असूनही त्याला बाद करण्यात आले कारण फक्त ऐवढे की त्याने वेळेत बॅट क्रीजच्या आत टेकवली नाही. रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसू येते की राहकीम क्रिजच्या आत पोहचला होता पण त्याने बॅट न टेकवल्याने तो बाद झाला. त्याची बॅट क्रीझच्या आत असली तरी, यावेळी ती हवेमध्ये होती आणि विकेटकीपरने जेव्हा चेंडू स्टंपवर मारला तेव्हा रकीम कॉर्नवॉलची बॅट मैदानाला स्पर्श करु शकली नाही. पहा याचा हा व्हिडिओ:
Reminds me of Inzamam pic.twitter.com/JXIfPxXjsd
— Shvm Kr (@shvm_kr) September 26, 2019
दरम्यान, कॉर्नवॉल ज्या प्रकारे बाद झाला ते पाहून पाकिस्तानचे माजी अनुभवी क्रिकेटपटू इंझमल उल हक यांचीच आठवण आली. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एका मॅचमध्ये इंझमाम अशाच प्रकारे बाद झाले होते. इंझमामचा बाद होण्याचा हा व्हिडिओमध्ये तुम्ही 19 मिनिट आणि 59 सेकंदपासून पाहू शकता.