प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) प्रभावित झालेल्या क्रिकेट टूर्नामेंट सुरु होण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल 2 महिन्यांनंतर पहिल्यांदा क्रिकेट सुरू होणार आहे. पूर्व व्हिएन्सींट व द ग्रेनेडीन्ससेंट विंसेंट आणि ग्रेनेडाइंस, या पूर्व कॅरिबियन देशात 22 ते 31 मे दरम्यान विंसी प्रीमियर टी-10 लीग (VPL) खेळला जाईल. 72 खेळाडूंसह एकूण 6 टीम या टूर्नामेंटमध्ये सहभागी होतील. या स्पर्धेत दररोज 3 आणि एकूण 30 सामने खेळले जातील. हे सर्व सामने सेंट व्हिन्सेंटमधील आर्नोस वेल स्पोर्टिंग कॉम्प्लेक्समध्ये होतील. या टूर्नामेंटमध्ये नवीन नियमही लागू करण्यात येतील. ही पहिली क्रिकेट स्पर्धा असेल ज्यामध्ये लाळ (Saliva) किंवा घाम (Sweat) चेंडू चमकविण्यासाठी वापरला जाणार नाही. कोरोना महामारीमुळे इंडियम प्रीमियर लीग (IPL) आणि कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) पुढे ढकलण्यात आले आहेत. कोविड-19 दरम्यान मागील सामना 15 मार्च रोजी पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) कराची किंग्ज आणि क्वेटा ग्लेडिएटर यांच्यात झाला होता. (Lockdown: क्रिकेट सुरू करण्याच्या दिशेने BCCI उचलणार पहिले पाऊल, ‘सेफ झोन’मध्ये खेळाडूंसाठी आयसोलेशन कॅम्प सुरु करण्याच्या तयारीत)

दरम्यान, या स्पर्धेत प्रेक्षकांच्या येण्यावर बंदी नसली तरी त्यांची एका ठराविक अंतरावर बसण्याची व्यवस्था केली जाईल. सामन्यादरम्यान वैद्यकीय पथकासह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असतील. सर्व संघासाठी गर्दी टाळण्याच्या हेतूने वेगळे ड्रेसिंग रूमही तयार करण्यात आई आहेत. व्हीपीएलच्या सर्व फ्रेंचायझींनी 11 मे रोजीच ड्राफ्टच्या माध्यमातून खेळाडूंची खरेदी केली. या लीगमध्ये वेस्ट इंडीजचा सलामीवीर फलंदाज सुनील अंब्रिस, गोलंदाज केसरिक विलियम्स आणि ओबेड मैककॉय यासह 6 मोठी नावेही खेळणार आहेत.

कोरोना व्हायरसमुळे जागतिक क्रिकेट स्पर्धा ठप्प झाल्यास असून, विन्सी प्रीमियर लीग ऐतिहासिक ठरणार आहे कारण यामुळे क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. दुसरीकडे, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक क्रिकेट बोर्डांनाही तोट्याला सामोरे जावे लागले आहे. या व्हायरसच वेगाने पसार झाल्यामुळे भारतालाही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे.