Coronavirus मुळे भारतात अडकला दक्षिण आफ्रिकी संघ, आज कोलकातामधून मायदेशी होणार रवाना
क्विंटन डी कॉक (Photo Credit: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) सर्व देशभर (किंवा खंडभर) पसरलेला असून जगभरातील 5,000 हून अधिक लोकांच्या जिवावर बेतला आहे आणि संपूर्ण विश्वात 1,60,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला असल्याने समोर आले आहे. भारतात 100 हुन अधिक कोविड-19 प्रकरणांची पुष्टी झाली आहे आणि आकडे खरोखर चिंताजनक असून अजून वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) मालिका रद्द झाल्यानंतर कालपासून कोलकातामध्ये अडकलेला दक्षिण आफ्रिकन संघ सोमवारी कोलकातामधील एका हॉटेलमध्ये थांबला होता. आफ्रिकेच्या संघाने लखनऊहून कोलकाताला (Kolkata) रस्त्याने जाण्याचे निवडले होते कारण कोलकातामध्ये अद्याप एकही कोरोना प्रकरण नोंदलेले नाही. त्यांची ईडन गार्डनच्या जवळ असलेल्या अलिपुरमधील हॉटेलऐवजी विमानतळ जवळील राजरहाट हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवारी ईडन गार्डन येथे दक्षिण आफ्रिका टीम इंडियाविरुद्ध तिसरा वनडे सामना खेळणार होते, पण कोरोनाच्या प्रसारामुळे मंगळवारी सकाळी कोलकातामधून दुबईहुन दक्षिण आफ्रिकेला जाण्यासाठी त्यांचे विमान उड्डाण घेईल. (COVID-19: कोरोना व्हायरसने क्रिकेटला केले बोल्ड; 'या' 8 मोठ्या क्रिकेट स्पर्धांवर झाला परिणाम, IPL ही लांबणीवर)

सूत्रांच्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना कोरोना विषाणूची भीती आहे. जगभरातील कोविड-19 च्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (सीएसए) सोमवारी देशातील सर्व प्रकारच्या क्रिकेट गतिविधी सोमवारी दोन महिन्यासाठी स्थगित केल्याचेही वृत्त समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी रविवारी आपत्कालीन स्थिती जाहीर केली, ज्यानंतर सीएसएने देशात विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून सर्व प्रकारच्या क्रिकेट क्रियाकलापांना स्थगिती दिली.

आज कोरोना विषाणूचा परिणाम जगभर पसरला आहे. यामुळे क्रीडा विश्वातील अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून काहींच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुरुवातीला मालिका रद्द होण्यापूर्वी लखनऊ आणि कोलकाता येथे दोन सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळवले जाईल असे ठरवण्यात आले होते, पण शुक्रवारी दोन्ही बोर्डांनी समन्वयाने मालिका स्थगित करण्याचा निर्णय घेतला.