Mohammad Hafeez (Photo Credits: Getty Images)

इंग्लंड दौर्‍यावर जाणार्‍या खेळाडूंची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी घेतली आली होती. दौऱ्यावर जाण्यासाठी निवड झालेल्या 29 खेळाडूंपैकी 10 खेळाडू कोविदा-19 संक्रमित आढळले. सोमवारी शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ असे तीन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले, तर मंगळवारी आलेल्या अहवालांत टीमचे आणखी सात खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यामध्ये फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज या खेळाडूंचा समावेश होता.  यादरम्यान, मोहम्मद हाफीजने (Mohammad Hafeez) स्वतःच्या जबाबदारीवर करोना चाचणी करवली ज्यामध्ये त्याला करोनाची लागण झालेली नसल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे करोना चाचणीवरुन पाक क्रिकेट बोर्डात सध्या गोंधळ पहायला मिळतंय. हाफीजने खुद्द ट्विट करून याबाबत माहिती दिली. (Coronavirus: 'व्हायरसला गंभीरपणे घ्या'! 10 पाकिस्तानी क्रिकेटपटू कोविड-19 पॉसिटीव्ह आढळल्यावर शाहिद आफ्रिदीचे नागरिकांना आवाहन)

हाफीजने ट्विट करून त्याचा कोरोना अहवाल शेअर करून याबाबत माहिती दिली. "काल पीसीबी चाचणी अहवालानुसार कोविड-19 संक्रमित आढल्यानंतर, दुसरे मत आणि समाधानासाठी मी माझ्या कुटुंबासमवेत वैयक्तिकरीत्या पुन्हा त्याची चाचणी घ्यायला गेलो आणि येथे मी माझ्या सर्व कुटुंब सदस्यांसह माझी चाचणी नकारात्मक आढळली." पाकिस्तानी खेळाडू कोरोना संक्रमित आढळून आल्याने सध्या त्यांच्या इंग्लंड दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

पाहा हाफीजचे ट्विट: 

दरम्यान, सकारात्मक चाचणी आढळलेल्या खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तात्काळ क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानी संघ 3 कसोटी आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे ज्यासाठी पाकिस्तानी बोर्डाने 29 खेळाडूंचा संघ जाहीर केला ज्यात 4 राखीव खेळाडूंचाही समावेश आहे. या दौऱ्यावर रवाना होण्याआधी खेळाडूंनी करोना चाचणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलं होतं.