Coronavirus: बांग्लादेशचे विकास प्रशिक्षक आणि माजी प्रथम श्रेणी क्रिकेटर आशिकुर रहमानची COVID-19 टेस्ट पॉसिटीव्ह
Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

बांग्लादेश संघाचे एक प्रशिक्षक कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) जाळ्यात अडकले आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे विकास प्रशिक्षक आणि बीसीबीचे (BCB) माजी प्रथम श्रेणी क्रिकेटर आशिकूर रहमान (Ashiqur Rahman) यांची कोरोना व्हायरस चाचणीत सकारात्मक आढळली आहे.कोविड-19 संक्रमित असल्याचा स्वतः रहमान यांनी खुलासा केला आहे. बांग्लादेशमधेही या व्हायरसचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे. रहमान यांनी मंगळवारी क्रिकबझला सांगितले की, “मला आज (12 मे) दुपारी रुग्णालयात दाखल केले आहे. हा अहवाल काल (11 मे) आला, त्यामध्ये मी कोविड-19 टेस्ट सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे." रहमान यांनी याची पुष्टी केली की त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली आहेत आणि छातीत दुखत आहे, ज्यासाची तपासणी करण्यासाठी ते रुग्णालयात गेले होते, ज्याची नोंद सकारात्मक आली. (Coronavirus: जर्मनीच्या टॉप दोन फुटबॉल विभागात 10 COVID-19 पॉसिटीव्ह प्रकरणे)

रहमान म्हणाले की, "मला यापूर्वी (कोरोना विषाणू) समजले नव्हते. मला वाटलं की माझ्याकडे सूजलेली टॉन्सिल आहे. मला आधी घसा खवखला, नंतर हळू हळू ताप आला, नंतर छातीत दुखले आणि डॉक्टरकडे जाऊन माझी टेस्ट करून घेतली." बांग्लादेशकडून 2002 अंडर-19 वर्ल्ड कप खेळणाऱ्या रहमान यांनी 15 प्रथम श्रेणी आणि 18 लिस्ट-ए सामने खेळले आहेत. 33 वर्षीय रहमान यांनी बांग्लादेश महिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम केले.

दरम्यान, जगभरात कोरोनामुळे 42 लाखाहून अधिक लोक बाधित झाले आहेत, तर 2 लाख 90 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बांग्लादेशमध्ये कोरोना ग्रस्तांचा आकडा 16 हजाराच्या वर पोहचला आहे आणि 250 लोकांनी आपला जीव गमावला आहे. अशा स्थितीत या व्हायरसमुळे बांग्लादेशवर वाईट परिणाम झाला आहे हे म्हणणे योग्य आहे.