Coronavirus: जर्मनीच्या टॉप दोन फुटबॉल विभागात 10 COVID-19 पॉसिटीव्ह प्रकरणे
फुटबॉल मॅच | प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

लीगच्या सर्व क्लबमध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) 1724 प्रकरणांची चाचणी करण्यात आली होती, ज्यातील पहिल्या दोन विभागांमध्ये 10 प्रकरणे सकारात्मक आढळून आल्याचा खुलासा जर्मन फुटबॉल लीगने (German Football League) केला आहे. स्थानिक आरोग्य प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व क्लब आणि विभागांनी वैयक्तिक पातळीवर तपासणी केली असल्याचे डीएफएलने सोमवारी सांगितले. क्लब गट प्रशिक्षण करत आहेत. “या आठवड्यात दुसऱ्या टप्प्याची चाचणी केली जाईल. येथे सकारात्मक आयसोलेटेड होऊ शकतात आणि हे संपूर्णपणे डिसमिस केले जाऊ शकत नाही," डीएफएल (DFL) म्हणाले. दरम्यान, सकारात्मक मिळालेल्यांमध्ये खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी सदस्यांचा समावेश आहे. यापैकी तीन प्रकरणे यापूर्वी समोर आली होती, ती कोलोन संघाशी संबंधित आहेत. तथापि, त्यानंतर क्लबने कोविड-19 (COVID-19) चे कोणतेही प्रकरण समोर आले नसल्याचे सांगितले. या महिन्यात हा हंगाम पुन्हा सुरू होईल अशी डीएफएलला आशा आहे. (Coronavirus: जुवेंटससाठी मोठा धक्का, अर्जेंटिना स्टार फुटबॉलपटू पाउलो देबाला याची चौथी कोरोना व्हायरस टेस्ट पॉसिटीव्ह-रिपोर्ट)

या महिन्यात 16 मे पासून हंगाम सुरू करण्यासाठी डीएफएल आशावादी आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. आणि बुंडेस्लिगा युरोपमधील पहिली फुटबॉल लीग मधून स्पर्धेत परतण्याच्या तयारीत आहे. कोरोना व्हायरसमुळे जर्मन फुटबॉलचा सत्र 13 मार्च रोजी थांबवण्यात आले होते. 16 मे रोजी प्रस्तावित तारखेसह बुंडेसलिगा प्रमुखांना सध्याची मोहीम पुन्हा सुरू करायची आहे, पण यावर अखेरचा निर्णय बुधवारी घेतला जाईल.

दुसरीकडे, इटली सरकारने चांगली बातमी सांगितली आहे. इटलीने रविवारी Sirie A फुटबॉल क्लबसाठी फुटबॉलपटूंना वैयक्तिक प्रशिक्षण सत्रात भाग घेण्यास अनुमती दिली. देशातील कोरोना विषाणूवरील कठोर निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत. यासह, इटलीद्वारे फुटबॉलच्या परतीची आशा वाढली आहे. करोना विषाणूमुळे इटलीमध्ये आतापर्यंत सुमारे 29 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.