क्रिकेट: शिव सिंहच्या 360° चेंडूवरुन वाद; पंच सायमन टॉफेल म्हणाले हे चुकेचे (व्हिडिओ)
हाच तो शिव सिंहचा 360° चेंडू (Photo Credit : Twitter)

क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. हा वाद शिव सिंहच्या 360° चेंडूवरुन निर्माण झाला आहे. माजी अंपायर (पंच) सायमन टॉफेल यांनीही हा चेंडू नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे. टॉफेल यांच्या म्हणण्यानुसार 360° चेंडू म्हणजे फलंदाचाचे लक्ष जाणीवपूर्वक विचलीत करण्यासाठी केलेला प्रकार आहे. फलंदाज आणि गोलांदाज यांच्या रिव्हर्स अॅक्शनबाबतच्या विचारांमध्ये कमालीचे अंतर असते. फलंदाजांना ज्या ठिकाणी फटका मारायचा असतो त्या पद्धतीची गोलंदाजी करणे गोलंदाजाला आवश्यक नसते, असेही टॉफेल यांनी म्हटले आहे.

गोलंदाजीच्या नियमाकडे बोट दाखवत टॉफेल यांनी सांगितले की, 'पंचाजवळ नियम 20.4.2.1 (अनुचित खेळ) आणि 20.4.2.7 (जाणीवपूर्वक लक्ष विचलित करणे) या दोन नियमांनुसार अशा पद्धतीचा चेंडू डेड म्हणून जाहीर करण्याचा अधिकार असतो. तसेच, गोलंदाजाने हा चेंडू का टाकला हे विचारण्याचाही पंचाला अधिकार असतो. या नियमाच्या अधारे पंच गोलंदाजाने फलंदाचाचे लक्ष विचलीत करण्यासाठी जाणीवपूर्वक तर, चेंडू टाकला नाही ना, हे जाणून घेऊ शकतो. माझ्या दृष्टीने तर, हे योग्य नसल्याचे टॉफेल यांनी म्हटले आहे.

पंश्चिम बंगालविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात उत्तर प्रदेशच्या शिव सिंहने हा जादूभरा चेंडू टाकला होता. मात्र, पंचाने हा चेंडू डेड म्हणून घोषीत केला. पंचाच्या या निर्णयानंतर शिव सिंह नाराज झाला. पण, त्याचा संघ पंचांसोबत चर्चा करताना मैदानावर दिसला. या चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य वक्त केले आहे. या चेंडूची क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीआहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन आणि भारतीय संघाचा माजी लेफ्ट आर्म स्पीनर बिशन सिंह बेदी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. (हेही वाचा, सोशल मीडियावर 'विराट' संघर्ष; कोहली विरुद्ध चाहते, एकमेकांना केले ट्रोल)

शिव सिंगने दिले स्पष्टीकरण

दरम्यान, आपण पहिल्यांदाच असा चेंडू टाकला नाही. तर, यापूर्वीही आपण अनेकदा अशा पद्धतीने चेंडू टाकला आहे. विजय हजारे ट्रॉफी वेळीही आपण असाच चेंडू टाकला होता. शिव सिंगचा युक्तिवाद असा की, फलंदाजही रिवर्स स्वीप खेळतो तर, गोलंदाजालाही असे काही करण्याची संधी जरुर असावी.