IPL 2021: कोरोनाच्या कारणामुळे खेळांडूनंतर आता अंपायर यांची सुद्धा टूर्नामेंटमधून माघार
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Instagram)

IPL 2021:  इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या 14 व्या सीजन मधून बाहेर पडण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे. याआधी आयपीएल मधील रविचंद्रन अश्विन, अॅड्र्यु टाय आणि लियमा लिविंस्टोन, एडम जॅम्पा आणि केन रिचर्डसन यांनी कोरोना संबंधित विविध कारणे देत खेळातून बाहेर पडले आहेत. त्यानंतर आता अंपायर सुद्धा या टूर्नामेंट मधून बाहेर पडत आहेत.(IPL 2021 Purple Cap Updated: राशिद खानची टॉप-3 मध्ये एंट्री, पर्पल कॅपवर RCB च्या हर्षल पटेलची मजबूत पकड)

आयपीएल मधून माघार घेणाऱ्यांच्या यादीत अंपायर नितिन मेनन आणि ऑस्ट्रेलियाई पॉल रिफेल यांचे नाव आहे. हे दोघे आयसीसीच्या अंपायरचे एलीट पॅनलचे हिस्सा आहेत. या दोघांनी खासगी कारणामुळे आयपीएल मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मेनन यांनी आपली आई कोरोना संक्रमित झाल्यानंतर इंदौर स्थित असलेल्या घरी परतण्याचा विचार केला आहे. तर माजी ऑस्ट्रेलियाई सीमर रिफेल यांनी त्यांच्या देशात जाण्यासाठी नंतर परवानगी नसल्याने खेळातून पाठी हटले आहेत.

एका बीसीसीआय अधिकाऱ्याने ANI यांनी असे म्हटले की, नितिन यांच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी टूर्नामेंटच्या बायो-बबल मधून बाहेर पडत आहेत. आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्या लवकरच बऱ्या होतील आणि आम्ही नेहमीच त्यांच्या मदतीसाठी सोबत आहोत. आमच्याकडे जो बॅकअप आहे त्याचा वापर करुन त्यांना तेथे नेमण्यात येणार आहे.(IPL 2021 Mid-Season Transfer: आयपीएलच्या ट्रांसफर विंडोद्वारे Mumbai Indians ‘या’ 3 खेळाडूंना करू शकतात टार्गेट, विरोधी संघावर पडू शकतात भारी)

बीसीसीआयच्या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांनी मंगळवारी आयपीएलच्या सर्व आठ टीम, खेळाडू, अधिकारी, कॉमेंटिटर्ससह कोचिंग आणि स्पोर्ट्स स्टाफ यांना टूर्नामेंट संपल्यानंतर सर्वांना घरी पाठवण्यासाठी सुरळीत वाहतूकीची सोय करणार असल्याचे म्हटले आहे, BCCI चा सल्ला ऑस्ट्रेलियाई सरकारद्वारे 15 मे पर्यंत भारतातून विमानसेवेवर बंदी घातल्याच्या निर्णयानंतर समोर आला आहे.