Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Odisha Shocker: ओडिशात (Odisha) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अंपायरला 'नो बॉल' (No Ball) देणं अंत्यत महागात पडलं आहे. नो बॉल दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने धारदार चाकूने अंपायरची हत्या केली. हे प्रकरण कटकमधील महिशिलंदा गावातील आहे. या ठिकाणी क्रिकेटचा सामना सुरू होता. यादरम्यान पंचांनी 'नो बॉल'चा निर्णय दिला. त्यामुळे नाराज तरुणाने अंपायरची हत्या केली. लकी राऊत (22 वय, रा. महिशिलांदा) असे मृत अंपायरचे नाव आहे. आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, महिसलंदा येथे ही स्पर्धा सुरू होती. ब्रह्मपूर आणि शंकरपूर हे दोन्ही संघ शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना खेळत होते. मात्र ब्रह्मपूर संघाविरुद्ध पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याने वाद सुरू झाला. पंचाच्या या निर्णयामुळे गावातील स्मृती रंजन राऊत नावाचा तरुण संतापला. त्याने पंचाशी वाद घालण्यास सुरुवात केली. हळूहळू वाद वाढत गेला. (हेही वाचा - Karnataka Shocker! कर्नाटकातील शिवमोग्गा येथील सरकारी रुग्णालयातून कुत्राने तोंडात धरून नेलं नवजात अर्भक; बालकाचा मृत्यू)

दरम्यान, स्मृती रंजन यांनी चाकू काढला आणि पंचांवर एकामागून एक हल्ला करण्यास सुरुवात केली. चाकूच्या हल्ल्यात पंच गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले.

उपचारादरम्यान, अंपायरला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, खबरदारी म्हणून गावात सुरक्षा दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.