बीसीसीआय (BCCI) दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावे खेलरत्न (Khel Ratna Award) आणि अर्जुन पुरस्कारांसाठी (Arjuna Award) पाठवली जातात. त्यानुसार, भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे. तर, भारतीय संघाचा तडाखेबाज खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan), गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि भारतीय महिला संघातील ऑलराउंडर दिप्ती शर्मा (Dipti Sharma) यांची नावे अर्जुन पुरस्कारांसाठी सुचवली आहेत. यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी जानेवारी 2016 ते डिसेंबर 2019 पर्यंत खेळाडूच्या प्रदर्शनावर आधारित पुरस्कार देण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खेळ मंत्रालयाने ई-मेलच्या माध्यमातून राष्ट्रीय खेळ पुरस्कारांची नावे मिळवली आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला खेळाडूंची नावे पाठवली जातात. परंतु, लॉकडाउनमुळे या प्रक्रियेला उशीर झाला आहे.
एकदिवसीय विश्वचषक 2019 मध्ये रोहित शर्मा यांनी धडाकेबाज कामगिरी करुन दाखवली होती. शिखरचे नाव 2018 साली अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्यात आले होते. मात्र, अंतिम यादीत त्याची निवड झालेली नव्हती. त्यामुळे यंदाच्या वर्षात कोणत्या खेळाडूची मानाच्या पुरस्कारासाठी निवड होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिखर धवन यानेही अनेक तडाखेबाज खेळी केल्या आहेत. धवनने कसोटी पदार्पणात सर्वात जलद शतक ठोकले आहे. महत्वाचे म्हणजे, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफित 2 गोल्डन बॅट मिळवणारा तो एकमेव फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये इशांत शर्मा हा भारतीय गोलंदाजात सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. तसेच महिला संघाची फिरकीपटू दीप्ती शर्मानेही अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. हे देखील वाचा- Forbes 2020 च्या यादीत स्थान पटकावणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटपटू, जाणून घ्या त्याची कमाई
एएनआयचे ट्वीट-
Board of Control for Cricket in India (BCCI) has nominated Rohit Sharma for Rajiv Gandhi Khel Ratna Award 2020. Ishant Sharma, Shikhar Dhawan and Deepti Sharma have been nominated for Arjuna Awards by the BCCI. pic.twitter.com/GZTPUVOYH3
— ANI (@ANI) May 30, 2020
जसप्रीत बुमराहचे नाव काही दिवसांपूर्वी अर्जुन पुरस्कारासाठी शर्यतीत होते. मात्र, अखेरीस सिनीअर खेळाडूंसोबतच्या शर्यतीत त्याचे नाव मागे पडले आहे. सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे खेळाडूंच्या प्रदर्शनाच्या आकडेवारीत फरक पडला आहे.