संजय मांजरेकर (Photo Credits: Instagram/ Sanjay Manjrekar)

भारताचे माजी फलंदाज आणि सध्याचे प्रसिद्ध प्रसारक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांची बीसीसीआयच्या (BCCI) कमेन्टरी पॅनेलमधून हकालपट्टी केल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारताच्या घरांच्या सामन्यांत भाष्य बॉक्समध्ये नियमित वैशिष्ट्य असलेले मांजरेकर यांचा आयपीएल (IPL) 2020 मधील कॉमेंट्री पॅनलमधेही समावेश होणे कठीण दिसत आहे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे यंदा बीसीसीआयने इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 15 एप्रिलपर्यंत स्थगित केले आहे. यंदा आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून मुंबईमध्ये होणार होती. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील पहिल्या वनडे सामन्यात मांजरेकर धर्मशाळेत उपस्थित नव्हते. मुंबई मिररच्या वृत्तानुसार बीसीसीआय पॅनेलचेइतर भाष्यकार सुनील गावस्कर, एल शिवरामकृष्णन आणि मुरली कार्तिक हे उपस्थित होते.

मांजरेकरांची हकालपट्टी करण्यामागचे कारण अस्याप स्पष्ट झाले नसले, तरी अधिकारी त्यांच्या कामावर खूष नसल्याचे मिररच्या अहवालात म्हटले आहे. “कदाचित त्यांना आयपीएल पॅनेलमधूनही बाहेर केले जाईल. या टप्प्यावर, याला आम्ही सध्या सर्वोच्च प्राधान्य देत नाही आहोत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की अधिकारी मांजरेकरांच्या कामावर खूष नाहीत, ”मिररला एका सूत्राने सांगितले.

दुसरीकडे, मागील वर्षी एकदा नव्हे तर दोनदा मांजरेकर यांना सोशल मीडिया यूजर्सच्या संतापाचा सामना करावा लागला होता जेव्हा त्यांनी रवींद्र जडेजाला पहिले बिट्स आणि पिसेस क्रिकेटपटू म्हटले आणि त्यानंतर काही महिन्यांनंतर सहकारी भाष्यकार हर्षा भोगले यांच्या क्रेडेन्शियल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मांजरेकर यांनी नंतर मात्र त्यांच्या दोन्ही टिप्पण्यांसाठी माफी मागितली होती. दरम्यान, बीसीसीआयने भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील उर्वरित दोन सामने रद्द करण्यात आले आहे.कोरोनाव्हायरसच्या धोक्यामुळे क्रिकेटपटू, सहाय्यक कर्मचारी आणि प्रसारक यांची सुरक्षा धोक्यात न टाकण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.