जगभरात कोरोना व्हायरस लॉकडाउनचा फटका अन्य क्रीडा स्पर्धांप्रमाणे क्रिकेटलाही बसला आहे. तब्बल दोन महिन्यांपासून भारतीय क्रिकेटर घरी बसलेले आहेत. मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिका रद्द झाल्यानंतर टीम इंडियाने एकही सामना खेळला नाही. त्यामुळे विराट कोहली आणि त्याची सेना सध्या घरातच कैद होऊन आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. या दरम्यान, भारतीय क्रिकेट बोर्ड बीसीसीआयच्या वतीनं खेळाडूंना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. भारतीय क्रिकेटपटूंवर दररोज नियंत्रण ठेवले जात असून बीसीसीआयने लॉकडाउनचा सामना करण्यासाठी मदत म्हणून एक एक्सकॅलुसीव्ही अॅप उपलब्ध करुन दिला आहे. या अॅपमध्ये ऑनलाइन प्रशिक्षण सत्र, चॅट रूम, इतरांमधील प्रश्नावली असून खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी चार-चरणांची योजना तयार केली गेली आहे. (भारतीय वनडे संघात पुनरागमन करण्यासाठी 'हे' 5 खेळाडू आहेत पात्र, एकाने निवृत्तीतून केले आहे कमबॅक)
बीसीसीआयच्या कोषाध्यक्ष अरुण धुमल (Arun Dhumal) यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “ही एक चरणवार प्रक्रिया आहे जी आतापर्यंत ठेवली गेली आहे आणि सचिव (जय शाह) दररोज प्रगतीचा आढावा घेत आहेत. “आम्ही करण्याचा प्रयत्न केला ही प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यात विभागली आहे. आमच्या क्रिकेटपटूंचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित बाबी, व्यावसायिक सहाय्य, आहारांचे परीक्षण, फिटनेस सत्र इत्यादी दररोज घेतल्या जात आहेत.” टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार खेळाडूंचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य नियमितपणे घेतले जात आहे. याशिवाय त्याचा डाएट आणि फिटनेस सत्रावरही लक्ष ठेवले जात आहे. हे सर्व एकूण 4 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पार पडले जाईल.
दुसरीकडे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर प्रत्येक खेळाडूसाठी वैयक्तिक योजना आखण्यात व्यस्त आहे. राठौर म्हणाले, “हे खेळाडू बोलत आहेत. मी जे विषय समोर आणले जात आहेत ते ऐकण्याचा आणि तयाचयावर कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्याकडे एक अॅप आहे. आम्ही त्या अॅपमध्ये व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली आहे.” क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर संघासाठी खास डिझाइन केलेल्या प्रश्नावलीद्वारे प्रत्येकाचा अभिप्राय घ्यायला तयार आहेत.