जॉन हेस्टिंग (Photo Credits: twitter)

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉन हेस्टिंग याचे करिअरच धोक्यात आले आहे. फुप्फुच्या आजारामुळे जॉन हेस्टिंग सध्या त्रस्त आहे. या त्रासामुळेच सध्या तो अनिश्चित काळासाठी मैदानाबाहेर आहे. ईएसपीएनक्रिकइंफो या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, हेस्टींग गोलंदाजीसाठी मैदानावर धावू लागतो तेव्हा, त्याच्या फुफ्फुसातून रक्तस्त्राव होऊ लागतो. रक्तस्त्राव होण्याचे नेमके कारण काय याबाबत त्याच्या डॉक्टरांनाही समजू शकले नाही.

ऑस्ट्रेलियाचे रेडिओ स्टेशन आरएसएनशी बोलताना हेस्टिंगने सांगितले की, माझ्यासाठी गेले तीन-चार महिन्यांचा कालावधी प्रचंड दुख:दायक राहिला आहे. मी जेव्हाही गोलंदाजीसाठी तयार होतो तेव्हा माझ्या छातीतून आणि काखांच्या खालून रक्त यायला सुरुवात होते. हेस्टींगने टेस्ट आणि वनडे सामन्यातून आगोदरच निवृत्ती घेतली आहे. सध्या तो टी-२० मध्ये खेळतो.

पुढे बोलताना हेस्टींगने म्हटले आहे की, यावर्षी मी गोलंदाजी करु शकणार नाही. माझ्यासाठी हा अत्यंत वाईट काळ आहे. सध्यास्थितीत मी काहीसा सावरलो आहे. मी आजवरचे संपूर्ण आयुष्य क्रिकेट खेळत आलो आहे. यापुढेही खेळण्याची इच्छा आहे.