खुशखबर! कोरोना संकट काळात 500 प्रेक्षकांच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियात रंगणार टी-20 स्पर्धा, वाचा सविस्तर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

करोना व्हायरसमुळे (Coronavirus) सुमारे दोन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले क्रिकेट प्रेक्षकांच्या उपस्थितीत पुन्हा सुरू होताना दिसत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव कायम असताना ऑस्ट्रेलिया (Australia) डार्विनमधील (Darwin) टी -20 कार्निव्हलसह स्पर्धात्मक कारवाईत पुनरागमन करण्यास सज्ज आहे. आणि विशेष म्हणजे, फक्त क्रिकेटचं नाही तर प्रेक्षक देखील क्रिकेटच्या मैदानावर हजेरी लावतील. यासह तब्बल दोन महिन्यांपासून ठप्प झालेले क्रिकेट सामने ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा सुरु होणार आहे. सीडीयू टॉप एंड टी-20 (CDU Top End T20) नावाची ही स्पर्धा राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार 6 ते 8 जून दरम्यान राणीच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेत 15 सामानाने खेळवणार येणार आहेत. क्रिकेट आधी काही फुटबॉल आणि क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या, पण त्यामध्ये प्रेक्षकांना येण्यास अनुमती नव्हती. मात्र, सीडीयू टॉप एंड टी-20 स्पर्धेत सुमारे 500 प्रेक्षकांना सामन्याच्या ठिकाणी जाऊन क्रिकेट पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. (ENG vs WI 2020: इंग्लंडविरुद्ध टेस्ट मालिकेसाठी वेस्ट इंडिज टीम जाहीर, 'या' 3 खेळाडूंनी दौऱ्यातून घेतली माघार)

ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील विभागात 21 मे पासून आजवर करोनाचा एकही नवीन रूग्ण आढळला नसल्याने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. या स्पर्धेत डार्विन प्रीमियर ग्रेडचे सात क्लब असतील आणि उत्तरेकडील विभागातील सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असलेला एक संघ असे आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये अखेर 13 मार्च रोजी न्यूझीलंड वनडे सामना खेळला गेला होता.

दरम्यान, मॅरारा क्रिकेट मैदान, गार्डन ओव्हल आणि कॅझलीच्या ओव्हल येथे सामने दररोज स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 आणि दुपारी 2.30 वाजता आयोजित केले जातील. स्पर्धात्मक क्रिकेट परतणाऱ्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे शनिवारपासून होणाऱ्या या स्पर्धेकडे बारीक लक्ष असेल. सामन्यात पांढरा कोकाबुरा बॉल चमकण्यासाठी घाम आणि लाळ वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही आणि कोणतेही कृत्रिम पदार्थ उपलब्ध होणार नाहीत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर केले होते ज्यात झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा समावेश होता.