वेस्ट इंडिजचा इंग्लंड दौरा (Photo Credit: Getty)

जुलै महिन्यात वेस्ट इंडिज (West Indies) संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड (England) दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही टीममध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. 2 जून रोजी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) देखील या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले, तथापि कोविड-19 मुळे या मालिकेच्या वेळापत्रकात काही बदल होऊ शकतात. जर ही मालिका झाली तर मार्चनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. दरम्यान, वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंनी या दौर्‍यावर जाण्याची इच्छा नसल्याचे वृत्त समोर आले आहे. क्रिकेट वेस्ट इंडीज निवड समितीने बुधवारी प्रस्तावित इंग्लंड दौर्‍यासाठी 14 खेळाडूंचा कसोटी संघ आणि 11 राखीव खेळाडूंची निवड केली. सीडब्ल्यूआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले, “ब्रिटन सरकारच्या अंतिम मान्यतेच्या अधीन, वेस्ट इंडीज 8 जुलैपासून बंद दरवाजा मागे खेळल्या जाणार्‍या सलग तीन टेस्ट मॅचमध्ये विस्डेन ट्रॉफीचा बचाव करेल. वेस्ट इंडिज टीम या आठवड्यात कोविड-19 चाचणी केल्यावर 8 जून रोजी खासगी चार्टरवर इंग्लंडला रवाना होणार आहे." (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि वेस्टइंडिज यांच्यात 3 सामन्याची कसोटी मालिका रंगणार; वेळापत्रक जाहीर)

"डॅरेन ब्रावो, शिमरोन हेटमायर आणि कीमो पॉल या सर्वांनी इंग्लंड दौर्‍यासाठी जाण्यास नकार दिला आणि सीडब्ल्यूआय त्यांच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतात. पूर्वी सांगितल्याप्रमाणे, सीडब्ल्यूआय भविष्यातील निवडीचा विचार करताना या खेळाडूंच्या विरोधात हा निर्णय घेणार नाही." टीममध्ये 2 नवीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मधल्याफळीत नक्रमा बोनर आणि वेगवान गोलंदाज केमर होल्डर. 22 वर्षीय होल्डे कर्णधार जेसन होल्डरशी संबंधित नाही. 2020 वेस्ट इंडीज चँपियनशिपमध्ये अग्रगण्य फलंदाजांपैकी एक झाल्यानंतर 31 वर्षीय बॉनर कसोटी संघात पदार्पण करणार आहे. 2011आणि 2012 मध्ये त्याने दोन टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले होते.

टीम: जेसन होल्डर (कॅप्टन), जर्मेन ब्लैकवुड, नक्रमा बोनर, क्रेग ब्रेथवेट, शामर ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेझ, रहकीम कॉर्नवॉल, शेन डोरिच, चेमार होल्डर, शाई होप, अल्झारी जोसेफ, रेमन रायफर, केमर रोच.

राखीव: सुनील अंब्रिस, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, केन हार्डिंग, काइल मेयर्स, प्रेस्टन मॅकसुविन, मार्क्विनो मिंडले, शेन मोसेली, अँडरसन फिलिप, ओशाने थॉमस, जोमेल वॉरिकन.