जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व खेळावर बंदी घालण्यात आली होती. कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लाॉकडाऊन असल्याने खेळाडू बरेच दिवस क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि वेस्टइंडिज (England Vs West Indies) यांच्यात कसोटी मालिका (Test Match series) रंगणार असल्याची माहिती समोर आली आहे. वेस्ट इंडिजचा संघ अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार जेसन होल्डर याच्या नेतृत्त्वाखाली जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीसाठी संघाने छोट्या छोट्या समूहात सरावाला सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजचे सहाय्यक प्रशिक्षक राँडी एस्टविक आणि बारबाडोस क्रिकेट संघाच्या अन्य प्रशिक्षकांच्या देखरेखित संघ मैदानात कसून सराव करत असल्याचे समजत आहेत.

वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत माहिती देताना म्हणाले की, खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. ही चांगली गोष्ट आहे. 28 मे रोजी बोर्ड आँफ डायरेक्टर्स यांच्यासोबत टेलीकाँन्फ्रेसिंग द्वारे बैठक पार पडली होती. जुलै महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिज संघ 9 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला सामना 8 जुलै ते 28 दरम्यान ही मालिका इंग्लंडमध्ये खेळली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, प्रेक्षकांशिवाय ही मालिका खेळली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस; अर्जुन अवॉर्डसाठी वंदना कटारिया, मोनिका आणि हरमनप्रीत सिंह शर्यतीत

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. जगभरात आतापर्यंत 64 लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी जवळपास 4 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 30 लाखांच्या जवळपास लोक कोरोनामुक्त झाले आहेत.