AUS (W) Vs IND (W), 2nd T20I (Photo Credit: Twitter)

Australia Women Vs India Women 2nd T20I: भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना उद्या मेट्रीकॉन मैदानावर पार पडणार आहे. दरम्यान, भारतीय संघ मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा संघ मालिका खिशात घालण्याच्या तयारीत आहे. यामुळे उद्याचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे.

दरम्यान, दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर मैदानात उतरलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर डगमगताना दिसला आहे. भारताने 20 षटकात 9 विकेट्स गमावून 118 धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्राकार हिने एकाकी झुंज देत 26 बॉलमध्ये 37 धावा केल्या. या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. हे देखील वाचा- IPL 2021: आरसीबीचे कर्णधारपद सोडण्यावर 2019 मध्ये AB de Villiers सोबत चर्चा झाली, विराट कोहलीचा मोठा खुलासा; ‘या’ कारणामुळे झाला विलंब

ट्वीट-

त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 5 बॉल राखून भारतावर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाकडून ताहिला मेग्राथ हिने तडाखेबाज फलंदाजी केली. तिने 33 बॉलमध्ये 42 धावा ठोकल्या. ज्यात 6 चौकारचा समावेश आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने 1-0 अशी आघाडी घेता आली आहे.