IPL 2021: आरसीबीचे कर्णधारपद सोडण्यावर 2019 मध्ये AB de Villiers सोबत चर्चा झाली, विराट कोहलीचा मोठा खुलासा; ‘या’ कारणामुळे झाला विलंब
विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स (Photo Credit: IANS)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सांगितले की त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) कर्णधारपद सोडण्याच्या कल्पनेवर त्याचा चांगल्या मित्र आणि सहकारी एबी डिव्हिलियर्सशी (AB de Villiers) 2019 च्या सुरुवातीला चर्चा केली होती. पण आरसीबीच्या (RCB) व्यवस्थापनात स्ट्रक्चरल बदल घडवून माइक हेसन (Mike Hesson) आल्यानंतर त्याने नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला असे कोहली म्हणाला. कोहली म्हणाला की त्याला आयपीएल हंगामात शांततापूर्ण वातावरण निर्माण करायचे होते आणि यामुळे त्याने कर्णधारपद सोडण्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त केले. उल्लेखनीय म्हणजे, कोहलीने गेल्या महिन्यात घोषणा केली होती की, आयपीएल 2021 नंतर तो आरसीबीचे कर्णधार पदावरून पायउतार होईल. कोहली म्हणाला की त्याने आपल्या कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आणि नजीकच्या भविष्यात त्याला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे. (IPL 2021: विराट कोहली नंतर कोणाच्या हाती जाणार RCB ची सूत्रे? ABD नव्हे डेल स्टेनने आरसीबीच्या माजी खेळाडूवर लावला दाव)

ऐतिहासिक दिवसापुर्वी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना तो म्हणाला, “या निर्णयाबद्दल, मी 2019 मध्ये AB शी बोललो होतो. हे नवीन नाही. IPL सह मी नेहमी अशा जागेत होतो जिथे मला शांततापूर्ण वातावरण निर्माण करायचे होते... आमची ही चर्चा झाली आणि मग मला वाटले की आम्ही अजून एक वर्ष करूया. व्यवस्थापनाची पुनर्रचना झाली आणि 2020 मध्ये गोष्टी अधिक चांगल्या झाल्या. त्या टप्प्यात मला थोडे अधिक आराम वाटला,” विराट कोहली म्हणाला. कोहलीने सलग दुसऱ्या मोसमात आरसीबीचे प्लेऑफपर्यंत नेतृत्व केले आहे. गतवर्षी एलिमिनेटरमध्ये बाद झालेल्या माजी फायनलिस्टना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागेल आणि पुन्हा एकदा एलिमिनेटर 1 खेळावे लागेल. आयपीएलनंतर, कोहली संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करेल. या दरम्यान माजी विजेते आयसीसीच्या जेतेपदासाठी त्यांची 8 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात असतील.

दरम्यान, एबी डिव्हिलियर्स म्हणाला की त्याने विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळण्याचा पूर्णपणे आनंद घेतला आहे आणि त्याच्या चांगल्या मित्राला आयपीएल 2021 मध्ये ट्रॉफी जिंकून त्याच्या कर्णधारपदाचा कार्यकाळ उंचावण्यास मदत करू इच्छितो. “विराट कोहलीने कर्णधार म्हणून अविश्वसनीय खेळ केला आहेत. मला त्याच्या अंतर्गत खेळण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे. मी गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ आणि आयपीएलमुळे त्याने घेतलेल्या दबावामुळे मी त्याचा चाहता आहे,” डिव्हिलियर्स म्हणाला.