पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट बोर्डने संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यासाठी टी-20 आणि टेस्ट संघाची घोषणा केली आहे. माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfraz Ahmed) याला टी-20 आणि कसोटी या दोन्ही संघातून वगळण्यात आले आहे. सरफराजच्या जागी मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याचा संघात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी सरफराजला सतत अपयशामुळे कर्णधार पदावरूनही हटवण्यात आले होते. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा 3 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याची सुरुवातटी-20 मालिकेपासून होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान 3 टी-20 आणि 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळणार आहे. पीसीबीने टेस्ट संघात 3 नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. मुसा खान, शाहीन शाह आफ्रिदी आणि 16-वर्षीय नसीम शाह यांचा समावेश करण्यात आला असून नसीम संघात सर्वात युवा खेळाडू आहे. सरफराजऐवजी हसन अली यालाही वगळण्यात आले आहे. हसनला पाठीच्या दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. 37 वर्षीय मोहम्मद इरफान यानेही 2013 नंतर पाकिस्तान राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. (पीसीबीने सरफराज अहमद यांना कर्णधार पदावरुन हटवले; अझर अली याच्याकडे कसोटी तर, बाबर आझम याच्याकडे टी-20 कर्णधारपदाची जबाबदारी)
वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान आणि मूसा खानला टी -20 संघात स्थान देण्यात आले आहे. तर, श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार्या उमर अकमल आणि अहमद शहजाद यालाही बाहेरचा मार्ग दाखविण्यात आला आहे. दरम्यान, टेस्ट संघात तीन युवा खेळाडूंशिवाय, मोहम्मद अब्बास आणि इमरान खान या अनुभवी खेळाडूंचाही समावेश केला आहे. 29 वर्षीय अब्बासने 14 टेस्ट सामने खेळले आहेत, 32 वर्षीय इमरान 9 टेस्ट मॅच खेळले आहेत.
असा आहे पाकिस्तान टी-20 आणि टेस्ट संघ:
पाकिस्तान टी-20 संघ: बाबर आझम (कॅप्टन), आसिफ अली, फखर जमान, हॅरिस सोहेल, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, इमाम-उल-हक, शादाब खान, मुसा खान, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), वहाब रियाज, खुशदिल खान आणि उस्मान कादिर.
पाकिस्तान टेस्ट संघ: अझहर अली (कॅप्टन), अबिद अली,बाबर आझम, हॅरिस सोहेल, असद शफिक, इमाम-उल हक, इमरान खान,इफ्तिखार अहमद, काशिफ भट्टी, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिझवान, मुसा खान, नसीम खान, शाहीन आफ्रिदी, शान मसूद आणि यासिर शाह.