यंदा 18 आणि 21 मार्च रोजी आशिया इलेव्हन (Asia XI) आणि वर्ल्ड इलेव्हन (World X) दरम्यान दोन टी-20 सामने खेळले जातील. बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (Bangladesh Cricket Board) या दोन टी-20 सामन्यांचे आयोजन करणार आहे. या दोन सामन्यांची मालिका पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्साहित आहेत. हे दोन्ही टी-20 सामने ढाकाच्या शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील. देशासाजे संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित होणार्या दोन टी-20 सामन्यांसाठी आशियाई संघात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) असावा, अशी बीसीबीची इच्छा आहे. शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशाचे पहिले राष्ट्रपती आणि दुसरे पंतप्रधान होते. आयएएनएसच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कर्णधार विराट कोहली, मोहम्मद शमी, शिखर धवन आणि कुलदीप यादव यांची नावे बीसीबीकडे (BCB) पाठविली असल्याचे समोर आले आहे. (बांग्लादेशमध्ये होणाऱ्या आशिया इलेव्हनमध्ये 5 भारतीय खेळण्याची BCCI ने केली पुष्टी, पाकिस्तानी क्रिकेटपटूंना वगळले)
घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, खेळाडूंची उपलब्धता तपासल्यानंतर गांगुलीने बीसीबीला नावे पाठवली होती. “खेळाडूंची उपलब्धता तपासल्यानंतर गांगुलीने बीसीबीला नावे पाठवली. आशिया इलेव्हन संघात कोहली, शमी, धवन आणि कुलदीप आमचे प्रतिनिधित्व करतील." सूत्रांनी सांगितले की, "आम्ही नावे पाठवल्यानंतर बराच वेळ झाला आहे कारण आशियाई संघ तयार करण्यास सक्षम होण्यासाठी बांग्लादेश बोर्डाला बीसीसीआयकडून यादी आवश्यक होती." दम्यान, या सामन्यासाठी पाकिस्तानचे कोणतेही खेळाडू आमंत्रित होणार नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सहसचिव जयेश जॉर्ज यांनी यापूर्वी दिले होते.
परंतु बीसीबीने पीसीबीवर बीसीसीआयची निवड करण्यासारखे हे नाही तर पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यात व्यस्त असल्याने पाकिस्तानचे खेळाडू अनुपलब्ध असल्याची बाब आहे, असे म्हणत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिले होते. वर्ल्ड इलेव्हन आणि आशिया इलेव्हन यांच्यातील टी-20 सामना 16-20 मार्च रोजी होणार होईल, तर पीएसएलचा अखेरचा सामना 22 मार्च रोजी संपण्याची शक्यता आहे.