Asia XI vs World XI: बांग्लादेशमध्ये होणाऱ्या आशिया इलेव्हनमध्ये 5 भारतीय खेळण्याची BCCI ने केली पुष्टी, पाकिस्तानी क्रिकेटपटूंना वगळले
विराट कोहली शॉट खेळताना (Photo Credit: Getty)

बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (Bangladesh Cricket Board) आशिया इलेव्हन (Asia XI) आणि वर्ल्ड इलेव्हन (World XI) यांच्यात मार्चमध्ये दोन टी-20 सामन्यांचे आयोजन करून देशाचे संस्थापक ‘बोंगोबोंधु’ शेख मुजीबुर रहमान (Sheikh Mujibur Rahman) यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहे. आयसीसीने या खेळांना अधिकृत दर्जा दिल्याचे म्हटले जात आहे. बीसीसीआय (BCCI) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर यापैकी एका सामन्याचे आयोजन करेल. या स्पर्धेत क्रिकेट विश्वातील विविध खेळाडूं सहभाग घेणार असल्याचे समजले जात आहे. या स्पर्धेसाठी सर्वच उत्सुक आहेत, विशेषतः भारत (India) आणि पाकिस्तानचे (Pakistan) चाहते. अनेक वर्षांपासून भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट संबंध थांबवण्यात आले आहे. दोन्ही देशांतील क्रिकेट टीममध्ये द्विपक्षीयक्रिकेट मालिका खेळली जात नाही. त्यामुळे, यामध्ये तरी दोन्ही देशातील खेळाडू सोबत खेळतील असे वाटत होते, पण बांग्लादेशमध्ये आयोजित या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश होणार नसल्याचे समजले जात आहे. (बांगलादेशमध्ये होणार आशिया XI आणि वर्ल्ड XI मध्ये टी-20 घमासान, विश्वक्रिकेटमधील चर्चित खेळाडू होऊ शकतात सहभागी)

आयएएनएसशी बोलताना बीसीसीआयचे सहसचिव जयेश जॉर्ज यांनी हे स्पष्ट केले आहे की भारत आणि पाकिस्तानचे दोन्ही खेळाडू आशिया इलेव्हनमध्ये एकत्र खेळतील अशी परिस्थिती उद्भवणार नाही कारण कोणताही पाकिस्तानी खेळाडू आमंत्रित नसतील असा संदेश देण्यात आला आहे. “आम्हाला काय माहित आहे की आशिया इलेव्हनमध्ये कोणतेही पाकिस्तानी खेळाडू असणार नाहीत. हाच संदेश आहे, म्हणूनच, दोन्ही देश एकत्र येण्याची किंवा एकमेकांना निवडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सौरव गांगुली आशिया इलेव्हनमध्ये सहभागी होणाऱ्या पाच खेळाडूंचा निर्णय घेईल, ”असे त्यांनी म्हटले. दरम्यान, बांग्लादेशमध्ये आयोजित या स्पर्धेसाठी गांगुली मोठ्या नावांना खेळू देईल की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे कारण या दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. आशिया इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन 18 ते 22 मार्च दरम्यान खेळली जाणार आहे.

बीसीबीआयने धोनी, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि रोहित शर्मा यांना पाठवावे अशी बीसीबीची इच्छा आहे. पण, अखेरचा निर्णय गांगुलीच घेतील आणि यापैकी कोणते खेळाडू आशिया इलेव्हनचा भाग बनेल हे लवकरच कळेल.