एशिया कप 2018 : बांग्लादेशचा 3 विकेट्सने पराभव ; एशिया कप सातव्यांदा भारताच्या नावे
एशिया कप (Photo Credits: Twitter)

एशिया कपचा बांग्लादेशविरुद्धचा अंतिम सामना जिंकत भारताने एशिया कप आपल्या नावे केला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने बांग्लादेशवर 3 विकेटने मात केली. प्रथम बॅटींग करत बांग्लादेशने सर्व विकेट गमावून 222 रन्स केले आणि भारतासमोर 223 रन्सचे लक्ष्य ठेवले. भारतीय टीमने हे लक्ष्य अगदी सहज गाठले. त्याचबरोबर हा अंतिम सामना जिंकत भारताने एशिया कप सातव्यांदा आपल्या नावे केला.

परंतु, भारतीय टीमची सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये शिखर धवन आणि रोहीत शर्माने जलद गतीने रन्स केले. मात्र 35 रन्सनंतर शिखर धवन (15) बाद झाला. त्यानंतर अंबती रायडूने 2 रन्स करत माघारी फिरला. 46 वर दोन विकेट गेल्यानंतर रोहीतने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण 17 व्या ओव्हरमधअये रुबेलच्या बॉलने त्याच्यीही विकेट घेतली. रोहीतने 55 बॉल्समध्ये तीन चौकार आणि तीन छटकार मारत 48 रन्स केले. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि महेंद्र सिंग धोनीने भारताचा डाव पुढे नेला आणि टीमची स्थिती मजबूत केली.

बांग्लादेशचा बॅट्समन लिटन दास (121) याच्या दमदार शतकानंतरही भारतीय बॉलर्ससमोर बांग्लादेशाची टीम तग धरु शकली नाही. लिटनशिवाय बांग्लादेशच्या कोणताही बॅट्समन चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे टीम दमदार स्कोर करु शकली नाही.

बांग्लादेशची कामगिरी रोखण्यात पार्ट टाईम स्पिनर केदार जाधवने महत्त्वाची भूमिका निभावली. तर कुलदीप यादवने तीन विकेट आपल्या नावे केल्या. आणि बांग्लादेशचे तीन बॅट्समन रन आऊट झाले.