ऑस्ट्रेलियन (Australia) गोलंदाज नॅथन लायन (Nathan Lyon) हा कसोटी क्रिकेटमधील शानदार गोलंदाज आहे. सध्या सुरु असलेल्या इंग्लंड (England) विरुद्ध अॅशेस (Ashes) मालिकेत लायनने ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज डेनिस लिली (Dennis Lillee) यांचा विक्रम मोडीत काढला आहे. हेडींगले येथे सुरु असलेल्या तिसऱ्या अॅशेस मॅचमध्ये लायनने इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याला बाद करत लिली यांना मागे सारत ऑस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये तिसरे सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. लिली यांनी त्यांच्या कारकिर्दीत 355 टेस्ट विकेट घेतल्या होत्या. आणि आजच्या सामन्यात रूटला लायनचा 356 वा बळी ठरला. लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या सामन्यात लायनने तीन विकेट घेत लिलीची बरोबरी केली होती. (Ashes 2019: इंग्लंडविरुद्ध हेडींगले टेस्टमध्ये मार्नस लाबुशेन याने इतिहास रचला; डॉन ब्रॅडमन, मॅथ्यू हेडन यांच्यासह 'या' यादीत झाला समावेश)
मात्र, लायनने डेनिस लिलीपेक्षा 18 सामने जास्त खेळले आहेत. लिली यांनी 70 व्या सामन्यात हा पराक्रम केला होता तर लायनने 89 व्या सामन्यात हा टप्पा पार केला. लिलीने आपला शेवटचा 70 वा सामना 1984 मध्ये खेळला होता. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये लायनने शानदार गोलंदाजी केली आणि 9 विकेट घेतल्या होत्या. लायनने 49 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या गोलंदाजीबद्दल तो म्हणाला होता की,"शेन वॉर्न (Shane Warne), ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) आणि डेनिस लिली यांच्याशी बरोबरीसाठी मी खूप संघर्ष केला. माझ्या मते हे सर्व महान खेळाडू आहेत."
What a G.O.A.T 🐐
Nathan Lyon has gone past Dennis Lillee to become the third highest Test wicket-taker for Australia!#Ashes pic.twitter.com/Jpd1iZMCAN
— ICC (@ICC) August 25, 2019
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न याने सर्वाधिक 708 विकेट्स घेतल्या आहेत तर मॅकग्रा 563 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी इंग्लंडने सुरुवातीला रूटची विकेट गमावली. आणि सध्या इंग्लंडची धावसंख्या 4 बाद 173 अशी आहे.