एमएस धोनी

माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Team) प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) म्हणाले की, सध्याच्या संघात स्थान मिळविण्याचा महान विकेटकीपर फलंदाज महेंद्र सिंह धोनी याची खात्री नाही. अशा परिस्थितीत निवडकर्त्यांनी त्यांच्या भविष्यावर चर्चा केली पाहिजे. क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानासाठी धोनीला योग्य सेंडऑफ मिळण्याचा हक्क असल्याचे कुंबळे यांचे मत आहे आणि त्यासाठी निवड समितीने त्यांच्याशी बोलले पाहिजे. धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्य सद्य चर्चेचा विषय बनला आहे आणि निवडकर्त्यांनी ते पुढे विचार करीत असल्याचे पुरेसे संकेतदेखील दिले आहेत. पुढील काही महिन्यांत निवडकर्त्यांनी भविष्यातील परिस्थिती स्पष्ट करावी अशी कुंबळेची इच्छा आहे. (MS Dhoni याचा नवीन अवतार सोशल मीडियावर व्हायरल; जयपूर एअरपोर्टवर 'या' लुक मध्ये दिसला माही, चाहत्यांनी घातला घेराव)

धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळ सुरू ठेवण्याबाबत विचारले असता, कुंबळेने क्रिकेटनेक्स्टला सांगितले की, ''मला वाटते रिषभ पंत (Rishabh Pant) याने विकेटकीपर-फलंदाज म्हणून निश्चितच जोरदार देवदार पेश केली आहे. विशेषत: टी-20 स्वरूपात त्याने चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत धोनीशी बोलणे महत्वाचे आहे. तो चांगला सेंडऑफ घेण्यास पात्र आहे आणि आपण त्याच्याशी याबाबत बोलले पाहिजे."

कुंबळे हे देखील म्हणाले की, माहीने विश्वचषकानंतर क्रिकेटपासून स्वत:ला दूर केले आहे. वेस्ट इंडीज दौर्यातूनही त्याने माघार घेतली होती आणि आता दक्षिण आफ्रिकेविरूद्धही त्याला संघात स्थान मिळाले नाही, याचा अर्थ काय? धोनी आगामी टी-20 विश्वचषक संघात फिट बसत असेल तर बोर्डाने त्याला सर्व सामने खेळायला द्यावे आणि जर तसे नसेल तर लवकरच त्यांच्या निवृत्तीबाबत मंडळाला निर्णय घ्यावा लागेल. ते म्हणाले, संघाच्या हितासाठी निवड समितीने यावर चर्चा केली पाहिजे. कारण यावर योग्यरित्या सर्वांना सांगितले जाणे महत्वाचे आहे." यासह कुंबळे म्हणाले की येत्या एक ते दोन महिन्यांत मंडळाला निर्णय घ्यावा लागेल.