MS Dhoni याचा नवीन अवतार सोशल मीडियावर व्हायरल; जयपूर एअरपोर्टवर 'या' लुक मध्ये दिसला माही, चाहत्यांनी घातला घेराव
एमएस धोनी (Photo Credit: @dhoniraina_team/Twitter)

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याला शनिवारी जयपूरमध्ये पहिले गेले. जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मध्ये भारतीय सैन्या (Indian Army) सोबत ट्रेनिंग घेतल्यानंतर धोनी पहिल्यांदा कॅमेरासमोर आला. धोनीचा जयपूर विमानतळावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये धोनीने डोक्यावर काळा कपडा आणि राखाडी रंगाचा स्वेटशर्ट परिधान केला आहे. धोनीला एअरपोर्टवर पाहता त्याच्या चाहत्यांनी घेराव घातला. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची झलक पाहण्यासाठी जयपूर विमानतळावर चाहत्यांची गर्दी केली. शिवाय, धोनीबरोबर फोटो घेण्यासाठी त्याच्याभोवती लोक जमा झाले होते. (महेंद्र सिंह धोनी याचा मोदी जॅकेट घातलेला फोटो पाहिला आहे का? राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण)

धोनीला त्याच्या गाडीकडे पोहोचण्यासाठी हसत हसत आणि चाहत्यांकडे विनवणी करावी लागली. त्याला सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्याला गाडीकडे पोहोचण्यास मदत केली. धोनी एका इव्हेंटमध्ये सहभागी होण्याकरिता जयपूरमध्ये पोहचला होता. धोनी दिवसभर जयपूरमध्ये राहिला आणि संध्याकाळी परतला. सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये धोनी एका नवीन लूकमध्ये दिसला. डोक्यावर काळा कपडा घातलेला धोनीचा नवीन लुक चाहत्यांना फारच पसंत पडलेला दिसतोय. सोशल मीडियावर त्याच्या या लुकचं चाहते मनभरून कौतुक करत आहेत.

दरम्यान, विश्वचषकनंतर धोनीने क्रिकेटपासून 2 महिन्यांचा ब्रेक घेतला आहे. या कारणास्तव, टीम इंडियासह तो वेस्ट इंडीज दौर्‍यावर जाऊ शकला नाही. तो विश्वचषकात खेळला होता आणि यादरम्यान संथ फलंदाजीमुळे तो टीकेचा बळी ठरला. यानंतर त्याच्या निवृत्तीच्या बातम्यादेखील तीव्र होत जाऊ लागल्या. यापूर्वी विश्वचषकमधील टीम इंडियाचा शेवटचा सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धोनीचा शेवटचा सामना असेल अशी बातमी मिळाली होती. पण, नंतर असे म्हटले जात आहे होते की, पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकपर्यंत धोनी खेळत राहील.