Team India (Photo Credit - Twitter)

आशियाई खेळ 2023 सुरू झाले आहेत. यावेळी चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिलांच्या क्रिकेट स्पर्धेबरोबरच पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेचाही आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाने शानदार सुरुवात केली आहे. गुरुवारी भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. भारताच्या महिला आणि पुरुष संघांना आता सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रत्येकी तीन सामने जिंकावे लागतील. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट 19 सप्टेंबरपासून सुरू झाले. भारतीय संघाने थेट उपांत्यपूर्व फेरीतच आपले स्थान निश्चित केले आहे. उपांत्यपूर्व फेरीत टीम इंडियाचा सामना मलेशियाशी होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला. आता उपांत्य फेरी 24 सप्टेंबरला तर अंतिम सामना 25 सप्टेंबरला होणार आहे. हे तीन सामने जिंकताच टीम इंडिया सुवर्णपदकावर कब्जा करेल.

27 सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटला सुरुवात होणार आहे. पहिला सामना नेपाळ आणि मंगोलिया यांच्यात होणार आहे. टीम इंडिया थेट उपांत्यपूर्व सामना खेळणार आहे. टीम इंडिया 3 ऑक्टोबरला उपांत्यपूर्व फेरीसाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाला सुवर्णपदक जिंकण्यासाठी फक्त तीन सामने जिंकावे लागतील. उपांत्यपूर्व फेरीनंतर उपांत्य फेरीचा सामना 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर 7 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवला जाईल. तिसर्‍या क्रमांकासाठीचा सामनाही त्याच दिवशी होणार आहे. (हे देखील वाचा: Asian Games 2023: फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होऊ शकतो सामना, हे मोठे समीकरण होत आहे तयार)

भारतीय पुरुष क्रिकेट संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), आकाश दीप

भारतीय महिला क्रिकेट संघ: स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, कनिका आहुजा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, मिन्नू मणी, राजेश्वरी गायकवाड, हरमनप्रीत कौर, हरमनप्रीत कौर, उ. बरेड्डी अनुषा, अंजली सरवाणी, तीतस साधू