Team India (Photo Credit - X)

Team India next match Schedule in 2024: टी-20 विश्वचषक 2024 मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर, टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेला (Sri Lanka) भेट दिली आणि तेथे दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली गेली. सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) नेतृत्वाखाली भारताने टी-20 मालिका जिंकली, तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय मालिका गमावली. ही एकदिवसीय मालिका संपल्यानंतर, टीम इंडिया आता दीर्घ विश्रांतीवर आहे आणि आता भारतीय संघ एका महिन्यापेक्षा जास्त काळ ऍक्शनमध्ये दिसणार नाही. भारतीय संघ कधी मैदानात उतरेल आणि कोणत्या संघाविरुद्ध क्रिकेट मालिका खेळेल हे आम्ही तुम्हाला सांगू.

टीम इंडिया 19 सप्टेंबरपासून उतरणार मैदानात

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यानंतर दीर्घ विश्रांतीवर जाणार असून यानंतर टीम इंडिया 19 सप्टेंबरपासून मैदानात दिसणार आहे. 19 सप्टेंबरपासून भारताला बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भाग घ्यायचा आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत तर दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाईल. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर दोन्ही देशांदरम्यान 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. (हे देखील वाचा: India’s Likely Squad for Test Series vs Bangladesh: श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतर आता रोहितसेनेसमोर असणार बांगलादेशचे आव्हान, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी)

न्यूझीलंड क्रिकेट संघ येणार भारत दौऱ्यावर

बांगलादेशविरुद्धच्या क्रिकेट मालिकेनंतर न्यूझीलंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध क्रिकेट मालिका खेळणार असून त्यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर टीम इंडिया 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दुसरीकडे, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला श्रीलंका दौऱ्यात विश्रांती देण्यात आली होती आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेद्वारे तो टीम इंडियात परतणार आहे. मात्र, बुमराह कसोटी संघाचा उपकर्णधार होणार की ही जबाबदारीही शुभमन गिलकडे सोपवली जाणार हे पाहणे बाकी आहे.

1. बांगलादेशचा भारत दौरा

19 ते 23 सप्टेंबर 2024 - भारत विरुद्ध बांगलादेश, पहिली कसोटी, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

27 सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 – भारत विरुद्ध बांगलादेश, दुसरी कसोटी, ग्रीन पार्क, कानपूर

06 ऑक्टोबर 2024 – भारत विरुद्ध बांगलादेश, पहिला टी-20 सामना, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्माशाला

9 ऑक्टोबर 2024 – भारत विरुद्ध बांगलादेश, दुसरा टी-20 सामना, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

12 ऑक्टोबर 2024 – भारत विरुद्ध बांगलादेश, तिसरा टी-20 सामना, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

2. न्यूझीलंडचा भारत दौरा

16 ते 20 ऑक्टोबर 2024 – भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली कसोटी, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

24 ते 28 ऑक्टोबर 2024 – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे

1 ते 5 नोव्हेंबर 2024 – भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरी कसोटी, वानखेडे स्टेडियम, मुंबई

3. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

22 ते 26 नोव्हेंबर 2024 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, पहिली कसोटी, पर्थ स्टेडियम, पर्थ

6 ते 10 डिसेंबर 2024 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, दुसरी कसोटी, ॲडलेड ओव्हल, ॲडलेड

14 ते 18 डिसेंबर 2024 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, तिसरी कसोटी, द गाबा, ब्रिस्बेन

26 ते 30 डिसेंबर 2024 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, चौथी कसोटी, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न

3 ते 7 जानेवारी 2025 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, पाचवी कसोटी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी