Afghanistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. ही एकदिवसीय मालिका अफगाणिस्तान आणि बांगलादेशसाठी खूप महत्त्वाची असणार आहे, कारण पाकिस्तानमध्ये खेळली जाणारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या दृष्टीने दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ( पाहा पोस्ट - AFG vs BAN 1st ODI 2024 Live Streaming: पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळला जाणार रोमांचक सामना, येथे जाणून घ्या कधी, कुठे पाहणार लाइव्ह प्रक्षेपण)
पाहा पोस्ट -
🚨 TOSS ALERT! 🚨
Afghanistan Skipper @Hashmat_50 has won the toss and decided that #AfghanAtalan will bat first in the first ODI against Bangladesh. 👍#AFGvBAN | GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/8wYJEaOG9c
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 6, 2024
वनडे फॉरमॅटमध्ये शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 2-1 असा मोठा विजय नोंदवल्यानंतर अफगाणिस्तान या मालिकेत आत्मविश्वासाने भरलेला असेल. तर बांग्लादेश संघ देखील या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्नात असेल. हुसेन शांतोकडे बांग्लादेश संघाचे नेतृत्व करत असून अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करत आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
बांगलादेश एकदिवसीय संघ: सौम्या सरकार, तनजीद हसन, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम, तौहीद हृदोय, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, नसुम अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान (विकेटकिपर)
अफगाणिस्तान एकदिवसीय संघ: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), सेदीकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, अल्लाह गझनफर, नांगेलिया खरोटे, फजलहक फारुकी