आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषकातील (World Cup) पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताने पाकिस्तानला (Pakistan) दहा गडी राखून पराभूत केले. या विजयासह भारत युवा संघ विश्वचषकच्या अंतिम सामन्यात पोहोचला, तर पाकिस्तानचा प्रवास संपुष्टात आला. भारताच्या विजयानंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवागने (Virender Sehwag) जबरदस्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ही प्रतिक्रिया पाहून वीरूने जणू काही पाकिस्तानच्या जखमांवर मीठ चोळल्या सारखे वाटत आहे. गतजेता भारताने संपूर्ण सामन्यात पाकिस्तानवर वर्चस्व राखले. पाकिस्तान फक्त नाणेफेक जिंकला, परंतु त्यानंतर तो बॅकफूटवर कायम राहिला. भारताची सलामीची जोडी यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी कोणत्याही प्रकारचा त्रास न करता सलग तिसऱ्यांदा भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविले. भारताच्या या शानदार विजयाबद्दल अंडर-19 संघाचे अभिनंदन केले जात आहे. (Video: भारत-पाकिस्तान अंडर-19 विश्वचषक सेमीफायनल सामन्यात आफ्रिकन चाहत्याने लगावले "काश्मीर बनेगा पाकिस्तान" चे नारे)
सहवागने ट्विटमध्ये लिहिले की, 'आता तर सवय आहे.' सहवाग हावभावांमध्ये म्हणाला की विश्वचषकमध्ये पाकिस्तानला पराभूत करणे ही भारताची सवय झाली आहे. विश्वचषकात भारताला पाकिस्तानला कधीही पराभूत करता आले नाही आणि अंडर-19 विश्वचषकात भारताने सलग चौथ्यांदा पाकिस्तानला पराभूत केले. सहवागच्या या ट्विटला सोशल मीडियावर चाहत्यांकडून अधिक पसंत केले जात आहे. सहवागच्या ट्विटवर चाहतेही मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
Ab toh Aadat si hai !#INDvsPAK pic.twitter.com/HbBjwedqYz
— Virender Sehwag (@virendersehwag) February 4, 2020
पाकिस्तानने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 173 धावांचे लक्ष्य भारताने 35.2 ओव्हरमधेच गाठले. भारतडकून यशस्वी जयस्वाल ने अंडर-19 कारकिर्दीतील हे तिसरे शतक ठोकले. यशस्वी 105 आणि दिव्यांश 59 धावा करून नाबाद परतले. भारताने युवा विश्वचषकच्या अंतिम सामन्यात विक्रमी सातव्यांदा, तर सलग तिसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषकची अंतिम फेरी गाठली. अशा प्रकारे सलग तीन आवृत्तीत अंतिम फेरीत प्रवेश करणारा भारत पहिला संघ ठरला.