Video: भारत-पाकिस्तान अंडर-19 विश्वचषक सेमीफायनल सामन्यात आफ्रिकन चाहत्याने लगावले 
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) सामन्यांमध्ये क्रिकेट चाहत्यांची आवड वेगळ्याच पातळीवर असते. मंगळवारी दोन्ही संघात दक्षिण आफ्रिकामध्ये अंडर-19 विश्वचषक (World Cup) सेमीफायनल सामना रंगला. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते पण सामना पूर्णपणे एकतर्फी असल्याचे सिद्ध झाले. 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 10 गडी राखून सहज विजय मिळवत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. भारतीय सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल याने शतकी खेळीच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानी संघाची लाजीरवाणी कामगिरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. पण, या दरम्यान असे काही घडले ज्याने सर्वांनाच  केले. या सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात दक्षिण आफ्रिकेमधील एक प्रशंसक 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' असे नारे लागवताना दिसत आहेत. (IND vs PAK U19 World Cup 2020: पाकिस्तानला 10 विकेटने पराभूत करत भारत फायनलमध्ये, यशस्वी जयस्वाल-दिव्यांश सक्सेना यांनी रचला इतिहास)

या चाहत्याची कृती कॅमेर्‍यावर कैद झाली होती आणि आता तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानच्या फलंदाजीच्या वेळी, स्टँडमध्ये बसलेल्या क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, अशी घोषणा केली होती जेव्हा आफ्रिकेच्या एका चाहत्याने 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' असे नारे लगावले. पाहा हा व्हिडिओ:

दरम्यान, विश्वचषकच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानने पहिले फलंदाजी करत भारताला 173 धावांचे लक्ष्य दिले. भारताची सलामी जोडी यशस्वीच्या नाबाद 105 आणि दिव्यांश सक्सेना याच्या नाबाद 59 धावांच्या जोरावर भारताने 35.2 ओव्हरमध्ये 10 गडी राखून संघाला विजय मिळवून दिला. दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी रेकॉर्ड धावांची भागीदारी झाली. या मोठ्या विजयासह भारताने सातव्यांदा, तर सलग तिसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला.  कर्णधार रोहले नजीरच्या अर्धशतकाचा अपवाद वगळ आणि हैदर अली 56 च्या महत्त्वपूर्ण खेळीच्या मदतीने संघाने 10 गडी गमावल्यानंतर 172 धावा केल्या. भारताच्या युवा गोलंदाजांनी खरोखरच स्तुती करण्यासारखी कामगिरी केली. कार्तिक त्यागीने 2 विकेट, सुशांत मिश्राने 3 गडी, रवी विश्वीने 46 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. फिरकी गोलंदाज अंकलेकरने 7 ओव्हरमध्ये 1 गडी बाद केला.