भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) मधील अंडर-19 विश्वचषकच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात माजी गतजेता टीम इंडियाने 10 विकेटने विजय मिळवला आणि विश्वचषकच्या फायनलमध्ये धडक मारली. पाकिस्तानने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 173 धावांचे लक्ष्य भारताने 35.2 ओव्हरमधेच गाठले. भारताने पहिले गोलंदाजीने आणि नंतर फलंदाजीने कमाल कामगिरी करत विजयाची नोंद केली. भारताकडून सलामी जोडी यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने शतक, तर दिव्यांश सक्सेना (Divyansh Saxena) यांने अर्धशतकी कामगिरी बजावली. यशस्वीने अंडर-19 कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. यशस्वी 105 आणि दिव्यांश 59 धावा करून नाबाद परतले. दोन्ही फलंदाजांमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी झाली. अंडर-19 विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये यशस्वी आणि दिव्यांशने पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारीचा विक्रम नोंदवला आहे. प्रत्युत्तरात एकही पाकिस्तानी गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही. यासह, भारताने युवा विश्वचषकच्या अंतिम सामन्यात विक्रमी सातव्यांदा, तर सलग तिसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषकची अंतिम फेरी गाठली. अशा प्रकारे सलग तीन आवृत्तीत अंतिम फेरीत प्रवेश करणारा भारत पहिला संघ ठरला. 2018 मध्ये पृथ्वी शॉने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्यापूर्वी 2016 मध्ये वेस्ट इंडीजकडून फायनलमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता.  (Video: दिव्यांश सक्सेना ने पाकिस्तान अंडर-19 विरुद्ध पकडला जबरदस्त कॅच, विराट कोहली च्या स्टाईलमध्ये सेलिब्रेट करत सर्वांना केले चकित)

भारताविरुद्ध पाकिस्तान संघाचा कर्णधार रोहेल नजीरने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु भारतीय गोलंदाजांनी सामना आपल्या आक्रमकता दाखवली आणि पाकिस्तानला 172 धावांवर ऑलआऊट केले. पाकिस्तानी संघ 43.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून कर्णधार रोहेल नजीरने 62 धावा आणि हैदर अलीने 56 धावा केल्या तर मोहम्मद हॅरिसने 21 धावांचे योगदान दिले. याखेरीज उर्वरित 8 फलंदाज दहाचा आकडाही स्पर्श करु शकले नाहीत. भारताकडून सुशांत मिश्राने 3, कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोईने 2-2 विकेट, यशस्वी आणि अथर्व यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दरम्यान अंडर-19 विश्वचषक फायनल 9 फेब्रुवारी रोजी सेनवेस पार्क, पॉचेफस्टरूममध्ये खेळला जाईल. यामध्ये भारताचा सामना न्यूझीलंड अंडर-19 आणि बांग्लादेश अंडर-19 संघातील विजयाशी होईल. न्यूझीलंड  आणि बांग्लादेश अंडर-19 संघ 6 फेब्रुवारी रोजी दुसरा सेमीफायनल सामना खेळतील.