KKR vs SRH (Photo Credit - X)

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 15 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात ईडन गार्डन्स, कोलकाता (Eden Gardens, Kolkata) येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अजिंक्य राहणे करत आहे. तर, हैदराबादची कमान पॅट कॅमिन्सच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाताने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.

हेड टू हेड रेकाॅर्ड (KKR vs SRH Head To Head)

आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. या काळात, कोलकाता नाईट रायडर्सने वरचढ कामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 19 सामने जिंकले आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादने फक्त नऊ सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये तीन सामने खेळले गेले. कोलकाता नाईट रायडर्सने तिन्ही सामने जिंकले होते. सनरायझर्स हैदराबाद संघाने 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शेवटचा विजय नोंदवला होता. यावेळी सनरायझर्स हैदराबाद पुनरागमन करू इच्छिते.

आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम 

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला टी-20 क्रिकेटमध्ये सात हजार धावा पूर्ण करण्यासाठी 63 धावांची आवश्यकता आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये, कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरला तीन हजार धावा पूर्ण करण्यासाठी 95 धावांची आवश्यकता आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणला टी-20 क्रिकेटमध्ये 4,500 धावा पूर्ण करण्यासाठी 80 धावांची आवश्यकता आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला आयपीएलमध्ये 2500 धावा पूर्ण करण्यासाठी सात धावांची आवश्यकता आहे.

आयपीएलमध्ये, कोलकाता नाईट रायडर्सचा घातक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला कोलकात्यात 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा घातक फलंदाज रिंकू सिंगला आयपीएलमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी 78 धावांची आवश्यकता आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये, कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीला भारतात 100 विकेट्स पूर्ण करण्यासाठी एका विकेटची आवश्यकता आहे.

सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड टी-20 क्रिकेटमधील त्याचा 150 वा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.

सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडला आयपीएलमध्ये 1,000 धावा पूर्ण करण्यासाठी 92 धावांची आवश्यकता आहे.

सनरायझर्स हैदराबादचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलला टी-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण करण्यासाठी तीन विकेट्सची आवश्यकता आहे.

सनरायझर्स हैदराबादचा स्टार गोलंदाज जयदेव उनाडकट टी-20क्रिकेटमधील त्याचा 200 वा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.