Sheryas Iyer (Photo Credit - Twitter)

Shreyas Iyer Injury Update: कोलंबोमध्ये भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील आशिया चषकाच्या सुपर 4 चा शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघात पाच मोठे बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये टिळक वर्मा (Tilak Verma) आणि सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) यांचा प्रथमच या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. मात्र, संघाचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पुन्हा एकदा प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालेले नाही. (हे देखील वाचा: Virat Kohli Carries Drinks for Teammates: भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात विराट कोहलीला विश्रांती, तरीही संघासाठी करतोय सर्वोत्तम कामगिरी (Watch Video)

आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सुपर 4 सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरला अचानक पाठदुखीचा त्रास होऊ लागला आणि त्यामुळे शेवटच्या क्षणी तो प्लेइंग 11 मधून बाहेर पडला. यानंतर तो श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही सहभागी होऊ शकला नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी अय्यर नेट सराव करताना दिसला होता, त्यामुळे तो प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवेल अशी अटकळ बांधली जात होती.

तथापि, बीसीसीआयच्या एका सूत्राने स्पोर्ट्स स्टारला सांगितले की, श्रेयस अय्यर पूर्वीपेक्षा खूप बरा आहे, परंतु तो अजूनही सामन्यासाठी 100 टक्के तंदुरुस्त नाही. अशा परिस्थितीत आता अय्यर थेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत दिसणार आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसीध कृष्णा