क्रिकेटमध्ये दररोज अनेक विक्रम रचले जातात. तर, काही विक्रम ब्रेकही केले जातात. मात्र, काही विक्रम असे असतात, ते वर्षानुवर्षे कायम राहतात. दरम्यान, क्रिकेटच्या मैदानात असे काही खेळाडू येऊन गेले आहेत की, त्यांनी केलेली कामगिरी न विसरता येणारी आहे. आज आपण सर्वाधिक मेडन ओव्हर (Most Maiden Overs) करणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजासंदर्भात जाणून घेणार आहोत. यात एका भारतीय खेळाडूचा समावेश असल्याचे भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या यादीतील गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरादार मैदान गाजवले आहे. आजही प्रेक्षक त्या खेळाडूंना विसरू शकलेले नाहीत, अशा खेळाडूंच्या प्रदर्शनावर नजर टाकूया.
या यादीत श्रीलंकेचा फिरकीपटू मुथैय्या मुरलीधरन अव्वल स्थानी आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त गोलंदाज शेन वॉर्न दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानी ग्लेन मॅकग्रा आणि चौथ्या क्रमांकावर अनिल कुंबले आहेत तर, पाचव्या स्थानी शॉन पोलॉक याचा क्रमांक लागतो. या सर्वांच्या विक्रमाची आकडेवारी जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे. हे देखील वाचा- IPL लिलावापूर्वी Arjun Tendulkar याने दाखवला दम; एका ओव्हरमध्ये लगावले 5 षटकार, 31 चेंडूत ठोकल्या 77 धावा
मुथैय्या मुरलीधरन-
मुरलीधनर यांनी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 1 हजार 992 मेडन ओव्हर टाकल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी सामन्यात 1 हजार 794 तर, एकदिवसीय सामन्यात 198 मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम नोंदवला आहे.
शेन वार्न-
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला शेन वार्नने कसोटी सामन्यात 1 हजार 761 तर, एकदिवसीय सामन्यात 110 मेडन ओव्हर केल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण 1 हजार 871 मेडन ओव्हर केल्याच विक्रम आहे.
ग्लेन मॅकग्राथ-
या यादीत ऑस्ट्रेलियाचा आणखी एक अनुभवी खेळाडू ग्लेन मॅकग्राथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॅकग्राने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1749 मेडन ओव्हर केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 124 सामने खेळताना 243 डावात 1 हजार 70 आणि एकदिवसीय 250 सामन्यात 248 डावात 279 मेडन ओव्हर केल्या आहेत.
अनिल कुंबले-
देशातील माजी महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचे नाव या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. कुंबळेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 1 हजार 576 मेडन ओव्हर टाकली आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 109 मेडन ओव्हर टाकणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
शॉन पोलॉक-
या यादीतील पाचवे आणि शेवटचे मोठे नाव आफ्रिकेचा माजी महान अष्टपैलू खेळाडू शॉन पोलॉक यांचे आहे. पोलॉकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 1 हजार 356 मेडन ओव्हर टाकल्या आहेत. पोलॉकने कसोटी क्रिकेटमध्ये 1 हजार 222 तर, एकदिवसीय सामन्यात 313 आणि टी-20 सामन्यात एक मेडन टाकली आहे.