IPL लिलावापूर्वी Arjun Tendulkar याने दाखवला दम; एका ओव्हरमध्ये लगावले 5 षटकार, 31 चेंडूत ठोकल्या 77 धावा
अर्जुन तेंडुलकर (Photo Credits: Instagram/Arjun Tendulkar)

मुंबईचा युवा अष्टपैलू आणि माजी क्रिकेटपटू सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आयपीएल लिलावात (IPL Auction) आपली दावेदारी मजबूत केली आहे. आयपीएल (IPL) लिलाव 2021 च्या लिलावासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंमध्ये अर्जुन तेंडुलकरचा देखील समावेश झाला आहे. आयपीएल 2021 लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणार आहे आणि फ्रँचायझी विशेषतः मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अर्जुनसाठी बोली लावावी अशी अनेक क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे. त्याआधीही अर्जुनने स्वत:ला सिद्ध करून एक उत्तम काम केले आहे. रविवारी मुंबईत 73 व्या पोलिस शिल्ड स्पर्धेचा (Police Shield Tournament) ग्रुप अ सामना होता. दुसर्‍या फेरीच्या सामन्यात अर्जुनने 31 चेंडूत नाबाद 77 धावा फटकावल्या आणि 41 धावा देत 3 विकेट देखील घेतल्या. त्याच्या कामगिरीच्या जोरावर एमआयजी क्रिकेट क्लबने इस्लाम जिमखानाला (Islam Gymkhana) 194 धावांनी पराभूत केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या तत्वाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर शहरातील ही पहिली क्रिकेट स्पर्धा होती. (IPL 2021 Auction: Arjun Tendulkar याच्यासाठी ‘या’ 3 कारणांमुळे आयपीएल 14च्या लिलावात फ्रँचायझीमध्ये रंगू शकते चुरशीची लढाई)

सामन्यात अर्जुनच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. एमआयजी क्रिकेट क्लबचा कर्णधार Kevin D'Almeida याने 93 चेंडूत 96 धावा केल्या, तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या प्रग्नेश कानपिलेवारने द्विशतकी खेळी केली. अर्जुनने खालच्या फळीत फलंडनजी केली आणि त्याच्या कॅमियोने एमआयजी क्रिकेट क्लबने निर्धारित 45 ओव्हरमध्ये 7 बाद. 385 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, इस्लाम जिमखाना पूर्ण 45 ओव्हर फलंदाजी करण्यात अपयशी ठरला 41.4 ओव्हरमध्ये 191 धावांवर ऑलआऊट झाला. अंकुश जयस्वाल (31 धावा देऊन 3 विकेट) आणि श्रेयस गुरव (34 धावा देऊन 3 विकेट) यांनी अर्जुनबरोबर विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, अर्जुन तेंडुलकरने नुकतंच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत मुंबईच्या वरिष्ठ संघात प्रवेश केला होता.

18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात नोंदणी केलेल्या 1097 खेळाडूंपैकी जगभरातील 292 क्रिकेटपटूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. अष्टपैलू प्रकारात अर्जुनने आपली बेस प्राईस 20 लाख रुपये ठेवली आहे.