Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना 1 डिसेंबर रोजी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे. एकीकडे हा सामना जिंकून अजेय आघाडी घेण्याचे भारताचे लक्ष्य असेल, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधायची असेल. रायपूरच्या मैदानावर फलंदाज किंवा गोलंदाज कोणाल मिळणार मदत, हवामान कसे असेल, स्टेडियमची आकडेवारी कशी असेल. या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (हे देखील वाचा: Kane Williamson Century: केन विल्यमसनची मोठी कामगिरी, बांगलादेशविरुद्ध ठोकले शतक; विराट कोहलीच्या या विक्रमाशी केली बरोबरी)

कशी आहे रायपुरची खेळपट्टी?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. हे स्टेडियम पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करेल. खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, येथे दव हा एक मोठा घटक ठरू शकतो. नाणेफेक जिंकल्यानंतर दोन्ही कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या गवताच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फिरकीपेक्षा जास्त मदत मिळते.

कसे असेल हवामान ?

1 डिसेंबर रोजी रायपूरमधील हवामानाचा अहवाल पाहिला तर संध्याकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, खेळादरम्यान कमाल तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सामन्याच्या दिवसापूर्वी पाऊस पडत असला तरी सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे चाहत्यांना या सामन्याचा पुरेपूर आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता नाही.

असे आहेत स्टेडियमचे रेकॉर्ड 

या स्टेडियमच्या रेकॉर्डबद्दल सांगायचे तर, आतापर्यंत येथे एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केलेला नाही. या वर्षी फक्त एक आंतरराष्ट्रीय सामना झाला आहे, तो एकदिवसीय स्वरूपाचा होता. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 108 धावांनी पराभव करत सामना 8 विकेटने जिंकला. या स्टेडियममध्ये आतापर्यंत 29 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 13 सामने जिंकले आहेत, तर पाठलाग करणाऱ्या संघाने 16 सामने जिंकले आहेत. येथे संघाची सर्वोच्च धावसंख्या 206 आहे, तर सर्वात कमी संघाची धावसंख्या 92 आहे.