Commonwealth Games 2022: लवप्रीत सिंहने वेटलिफ्टिंगमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकलं, भारताची पदकसंख्या चौदावर
Lovepreet Singh (Photo Credit - Twitter)

राष्ट्रकुल 2022 च्या क्रीडा स्पर्धेत भारताची चमक कायम आहे. विशेषत: भारताच्या वेटलिफ्टर्सनी या स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. खेळांच्या सहाव्या दिवशी बुधवारी, 3 ऑगस्ट रोजी लवप्रीत सिंगने भारताला 14 वे पदक मिळवून दिले. लवप्रीत सिंहने (Lovepreet Singh) वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. प्रयत्नांच्या बाबतीत, लवप्रीत सिंह हा या स्पर्धेतील भारताचा सर्वात यशस्वी वेटलिफ्टर आहे, त्याने त्याचे सर्व प्रयत्न यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. वेटलिफ्टिंग पुरुषांच्या 109 किलो गटात 24 वर्षीय लवप्रीत सिंहने भाग घेतला. त्याने भारताला कांस्यपदक मिळवून दिले. वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे 9वे पदक आहे. पुरुषांच्या 109 किलो गटात, लवप्रीत सिंहने स्नॅच फेरीत 163 किलो वजन उचलले, ज्यामध्ये त्याचे तीनही प्रयत्न यशस्वी झाले. त्याचवेळी त्याने क्लीन अँड जर्कमध्ये सर्वाधिक 192 किलो वजन उचलले. अशा प्रकारे तो 355 किलो वजनासह तिसरा क्रमांक पटकावला.

Tweet

109 किलो वजनी गटात सुवर्णपदक कॅमेरूनच्या ज्युनियर पेरिकलेक्स नगादजा न्याबायेयूने पटकावले. त्याने 361 किलो वजन उचलले. त्याने स्नॅचमध्ये 160 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 205 किलो वजन उचलले. दुसरीकडे, सामोआचा जॅक हिटिला ओपालॉग दुसऱ्या क्रमांकावर होता, ज्याने स्नॅचमध्ये 164 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 194 किलो वजन उचलले. अशा प्रकारे तो 358 किलो वजन उचलू शकला आणि रौप्य पदक जिंकले. (हे देखील वाचा: Commonwealth Games 2022: भारताला मिळाले अजून एक सुवर्णपदक, पुरुष टेबल टेनिस संघाचा सिंगापूरवर विजय मिळवत सुवर्णपदकावर केला कब्जा)

संकेत सरगर, गुरुराजा पुजारी, मीराबाई चानू, बिंदयाराणी देवी, जेरेमी लालरिनुंगा, अचिंता शेउली, हरजिंदर कौर, विकास ठाकूर आणि आता लवप्रीत सिंग यांनी वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. यापैकी मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा आणि अचिंता शेउली यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.