Video: सचिन तेंडुलकर याने 5 वर्षानंतर केली बॅटिंग; बुशफायर बॅशमध्ये एलिसे पेरी, अ‍ॅनाबेल सदरलँडविरुद्ध दाखवला दम
सचिन तेंडुलकर (Photo Credits: Twitter)

ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीत बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी ऐतिहासिक क्रिकेट सामना मेलबर्नच्या जंक्शन ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या चॅरिटी मॅचद्वारे जमा केलेली निधी बाधितांच्या मदतीसाठी दिला जाईल. बुशफायर क्रिकेट बॅश (Bushfire Cricket Bash) म्हणून खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू रिकी पॉन्टिंग इलेव्हन आणि अ‍ॅडम गिलक्रिस्ट इलेव्हन यांच्यात लढत सुरु आहे. त्याच सामन्याच्या मधल्या ब्रेकदरम्यान ऑस्ट्रेलियाची महिला खेळाडू एलिसे पेरी (Ellyse Perry) क्रिकेटचा देव, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ला एक ओव्हर टाकताना दिसली. सचिनने यामध्ये पहिल्या चेंडूपासून जबरदस्त बॅटिंग केली आणि आपल्या जुन्या बॅटिंग शैलीचे प्रदर्शन केले. (One Over Only! सचिन तेंडुलकर ने स्वीकारले महिला क्रिकेटपटू एलिसे पेरी चे आव्हान, एक ओव्हर खेळण्यासाठी करणार पुनरागमन)

बुशफायर बॅशच्या ब्रेक दरम्यान सचिनने पेरी आणिअ‍ॅनाबेल सदरलँड (Annabel Sutherland) चा एका ओव्हरमध्ये सामना केला आणि आपला दम दाखवला. तब्बल साडेपाच वर्षानंतर बॅट हातात घेतल्याचे सचिनने म्हणटले. बऱ्याच वर्षानंतर बॅट हातात घेतल्याबद्दल या ओव्हरनंतर सचिनला त्याच्या अनुभवाविषयी विचारले असता तो म्हणाला, "बॉल अजूनही मला दिसत आहे की नाही याचा मी काल सराव करीत होतो. बॉल अजूनही दिसत असेल तर काही हरकत नाही." या सामन्याच्या आदल्या दिवशी सोशल मीडियावर सचिनसमोर पेरीने आव्हान ठेवले होते जे सचिनने खुशीने स्वीकारले आणि आज एक ओव्हरसाठी तो बॅटिंग करण्यासाठी आला. सचिनने पेरीची इच्छा पूर्ण केली आणि पेरीच्या पहिल्या चेंडूवर सचिनने चौकार ठोकला. पाहा हा व्हिडिओ:

16 नोव्हेंबर 2013 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आणि आता सचिनने साडेपाच वर्षांनंतर मैदानात फलंदाज म्हणून पुनरागमन केले. पेरीची इच्छा पूर्ण करण्यासाठी सचिनने नेट्समध्ये 40 मिनिटे फलंदाजी केली. युवराज सिंहने Cricket.com.au च्या व्हिडिओमध्ये खुलासा केला.