Tokyo Paralympics 2020: बॅडमिंटनपटू सुहास यथिराजने सामन्यात जर्मनीच्या निकलास पॉटला केले पराभूत करत मिळवले तिसरे स्थान
Suhas Yathiraj (Pic Credit - ANI)

भारताचे बॅडमिंटनपटू (Badminton player ) सुहास यथिराज (Suhas Yathiraj) यांनी टोकियो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) मध्ये शानदार सुरुवात केली आहे. त्याने त्याच्या पुरुष एकेरी श्रेणी SL4- गट A चा पहिला सामना जिंकला आहे. सुहासने हा सामना सहज जिंकला. या सामन्यात त्याला जर्मनीच्या निकलास पॉटच्या (Niklas Pot) आव्हानाला सामोरे जावे लागले. सुहासने एकतर्फी खेळ दाखवत 21-9, 21-3 ने विजय मिळवला. सुहासला जिंकण्यासाठी फक्त 19 मिनिटे लागली. त्याच्या पुढील सामन्यात, सुहासचा सामना इंडोनेशियाच्या हॅरी सुसांतोशी (Harry Susanto of Indonesia) होईल. सुहास हे उत्तर प्रदेशातील नोएडाचे डीएम (DM) आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे ते देशातील पहिले IAS अधिकारी आहेत. कोरोना दरम्यान त्याच्या खांद्यावर बरीच जबाबदारी होती. परंतु हे सर्व हाताळताना त्याने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले आणि पॅरालिम्पिक गेम्समध्ये भाग घेण्यात यशस्वी झाला.

येथे त्याने आपल्या मोहिमेची उत्तम सुरुवात केली आहे. त्याने ब्राझील ओपन आणि पेरू ओपन मध्ये भाग घेतला होता. जिथे तो सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी झाला. या कामगिरीच्या आधारावर त्याची जागतिक क्रमवारी तीनवर आली आहे. यानंतर सुहास एकही स्पर्धा खेळू शकला नाही. मात्र जागतिक क्रमवारीमुळे त्याला पॅरालिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळाले.

पुरुष एकेरीत सुहास व्यतिरिक्त भारतासाठी आणखी एक विजय झाला आहे.  भारताच्या तरुण ढिल्लनं पुरुष एकेरी प्रकारात SL4 च्या गट B चा पहिला सामना जिंकला आहे. तरुणाने 21-7, 21-13 असा सामना जिंकला. त्यांना हा सामना जिंकण्यासाठी 23 मिनिटे लागली. त्याच्या दुसऱ्या सामन्यात तरुणचा सामना कोरियाच्या कयांग ह्वान शिनशी होईल.

टोकियो 2020 पॅरालिम्पिकमध्ये सुहास पदकाचा दावेदार असल्याचे मानले जाते.  रँकिंगमध्ये सुहास तिसऱ्या स्थानावर आहे. टोकियोला जाण्यापूर्वी सुहास म्हणाला होता की, त्याची नजर सुवर्णपदक जिंकण्यावर आहे. याआधी मात्र सुहासने 2016 मध्ये आपला प्रवास सुरू केला. 2016 मध्ये सुहासने आशियाई पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत खेळताना भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. जरी सुहास म्हणतो की खेळ हा नेहमीच त्याच्या जीवनाचा एक भाग राहिला आहे, परंतु त्याने खूप नंतर बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. 

सुहास 2007 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. सुहासचे पहिले पोस्टिंग आग्रा येथे होते. यानंतर ते जौनपूर, सोनभद्र, आझमगड, हातरस, महाराजगंज, प्रयागराज आणि गौतम बुध नगरचे जिल्हा दंडाधिकारी झाले. सुहास सध्या गौतम बुध नगर जिल्ह्याच्या डीएम पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.