टीम इंडियाचा (Team India) फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि त्याची पत्नी राधिका धोपावकर (Radhika Dhopavkar) दुसऱ्यांदा पालकत्व स्वीकारणार आहेत. शुक्रवारी राधिकाने रहाणे आणि त्यांची मुलगी आर्यासोबतचा एक फोटो शेअर केला. तथापि, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे राधिकाचा बेबी बंप अगदी दृश्यमान होता आणि तिने स्वतः ऑक्टोबरमध्ये तिच्या दुस-या मुलाचे स्वागत करण्याचे संकेत दिले. भारताचा माजी उपकर्णधार रहाणे आणि त्याची पत्नी राधिका यांनी यापूर्वी 2019 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले होते. राधिकाने त्यांच्या दुसऱ्या अपत्याची घोषणा करणारी Instagram वरील नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
राधिकाच्या फोटोच्या टिप्पण्या विभागात चाहत्यांनी पूर आणला आहे. या जोडप्यासाठी अभिनंदन संदेशांचा वर्षाव सुरूच आहे. राधिकाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी आणि भारतीय क्रिकेटर्सनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये अजिंक्य पत्नी आणि मुलीच्या मागे उभा आहे. आर्या आणि राधिका सोफ्यावर बसले आहेत. आर्या तिच्या आईसोबत मस्ती करताना दिसत आहे.
View this post on Instagram
रहाणे यादरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मेन इन ब्लूकडून शेवटचा खेळला, ज्यामध्ये तो फलंदाजीत प्रभाव पाडू शकला नाही आणि त्यानंतर त्याला श्रीलंकेच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. IPL 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससह सात सामन्यांत केवळ 133 धावा केल्या. फ्रँचायझीसाठी मोसमातील अंतिम सामन्यात दुखापत झाल्यामुळे त्याच्या दुःखात आणखी भर पडली आणि उर्वरित स्पर्धेसाठी तो बाहेर पडला.