सचिन तेंडुलकर आणि सानिया मिर्झा (Photo Credit: Instagram/Pixabay)

रविवारी (26 जानेवारी) संपूर्ण देशभरात देशाचा 71 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी महात्मा गांधींच्या सत्याचा आणि अहिंसेचा संदेश देण्याची मागणी केली आणि लोकं विशेषत: तरुणांना अहिंसेचे अनुसरण करण्याची आणि सामाजिक व आर्थिक उद्दीष्टे साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धती अवलंबण्याचे आवाहन केले. यामध्ये ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि अन्य खेळाडूंनी सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, पण गौतम गंभीर आणि वीरेंद्र सहवाग यांच्या ट्विटने सर्वांचे मन जिंकले. अत्यंत खास अंदाजात सहवागने ट्विटरवरून देशवासीयांचे अभिनंदन केले. (Republic Day 2020: प्रजासत्ताक दिन निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शहा, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, आदी दिग्गज नेत्यांनी भारतीयांना दिल्या शुभेच्छा!)

प्रजासत्ताक दिनी देशभर आनंद साजरा केले जात आहे. वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, मोहम्मद कैफ, इरफान पठाण या दिग्गजांनी ट्विटरवरून 26 जानेवारी रोजी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना गंभीरने तानिया शेरगिलचा उल्लेख केला. गंभीरच्या या ट्विटला यूजर्सकडून अधिक पसंती मिळत आहे. गंभीरने ट्वीट केले की, "दोन मुलींचा पिता असल्याचा मला एक अभिमान वाटतो की एक महिला प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व करीत आहे. हॅट्स वगग तानिया शेरगिलच्या."

सहवाग प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत लिहिले, "काही नशा तिरंग्याची शान आहे, काही नाश मातृभूमीच्या अभिमानात आहेत, आम्ही हा तिरंगा सर्वत्र फहरवु, हा नशा म्हणजे भारताचा अभिमान आहे."

तेंडुलकरने लिहिले- 'प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!'

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, सानिया मिर्झाने ट्विट केले.

मोहम्मद कैफ याने ट्विटमध्ये लिहिले की, "तुमच्या देशाने तुमच्यासाठी काय केले आहे, असे विचारू नका, तुम्ही तुमच्या देशासाठी काय करू शकता ते विचारा."

व्हीव्हीएस लक्ष्मणने ही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रजासत्ताक दिनी इरफान पठाण यांनी न्यूझीलंड येथून देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

रविचंद्रन अश्विन

हरभजन सिंह

प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला ‘प्रजासत्ताक दिन’ (Republic Day) साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु, 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्य घटना अंमलात आली. त्यामुळे हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.